शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

५२ वस्त्यांतील झोपडपट्टीधारकांना मिळणार मालकी पट्टे

By admin | Updated: August 25, 2016 02:15 IST

नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर गेल्या ४५ वर्षापासून वास्तव्यास असलेल्या ५२ वस्त्यांतील

राज्य सरकारतर्फे आदेश जारी पाच लाख नागरिकांना लाभ मुख्यमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वी केली होती घोषणा नागपूर : नागपूर शहरातील नासुप्रच्या जागेवर गेल्या ४५ वर्षापासून वास्तव्यास असलेल्या ५२ वस्त्यांतील झोपडपट्टीधारक ांना मालकीहक्काचे पट्टे देण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला आहे.या निर्णयाचा लाभ शहरातील पाच लाख झोपडपट्टीधारकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी नासुप्रच्या शिबिरात या संबंधीची घोषणा केली होती. नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने १४ जुलै २०१५ रोजी नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव १९ आॅगस्ट २०१५ रोजी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नागपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी गेल्या सात वर्षापासून आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी शासनाकडे पाठपुरावा करीत होते. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी व मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. यातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या ५२ वस्त्यापैकी १३ वस्त्या पूर्व नागपुरातील आहेत. यात शांतिनगर, डिप्टी सिग्नल, सोनबाजीनगर, खारकरवाडी, आदर्शनगर(रिंगरोड),स्मॉल फॅक्ट्री एरिया, भगवतीनगर, प्रजापतीनगर, डिप्टी सिग्नलचा पूर्व भाग, पाचझोपडा, गोपालनगर, आदर्शनगगर(पूर्व रिंगरोड), टिंबरमार्केट स्वीपर कॉलनी व संतोषीनगर आदींचा समावेश आहे.शहरातील इतर पाच विधानसभा क्षेत्रातील झोपडपट्ट्यात संजयनगर(नॉर्थ रिंगरोड),शिवाजीनगर, नंदाजीनगर, गोंडपुरा, अलिमिया चौकी, जुनी शुक्रवारी, कुणबीपुरा, माळीपुरा, सेवादलनगर, सेवानगर, राहुलनगर, आझादनगर, लष्करीबाग-१, पंचशीलनगर, कस्तुरबानगर, लष्करीबाग-२, आनंदनगर गोंडपुरा, जाटतरोडी, बोरकरनगर, बन्सोड मोहल्ला, धम्मदिपनगर-२, इंदिरानगर , जाटतरोडी-२, कुंदनलाल लायब्ररी, बिनाकी, संतोषनगर, मानकापूर, संजय गांधीनगर,(दक्षिण),धम्मदीपनगर(दक्षिण भाग),राजीवनगर(पूर्व भाग), सक्करदरा, काफला वस्ती, इमामवाडा-२, मातोश्री रमाईनगर, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, गुलाबबाबा झोपडपट्टी, सुमितनगर, अंबाझरी आदी झोपडपट्ट्यांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)मागासवर्गीयांना शुल्क नाही नासुप्रच्या जागेवर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटप करण्यासाठी नासुप्रच्या जमीन विनियोग नियम १९८३ च्या नियम २६ अन्वये शासनाला असलेल्या अधिकाराचा नियम ५(२) स्थगित करून हा निर्णय घेण्यात आला आहे. गलिच्छ वस्ती म्हणून जाहीर करण्यात आलेल्या वसाहतीमधील रहिवाशांना पट्टे वाटप करताना अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना यासाठी कोणत्याही स्वरुपाचे शुल्क आकारले जाणार नाही. खुल्या गटाकरिता ५०० चौरस फुटापर्यंतच शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच ८६ झोपडपट्ट्यांचा निर्णयपहिल्या टप्प्यात ५२ वस्त्यांतील झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासन लवकरच दुसऱ्या टप्प्यात ८६ वस्त्यांच्या संदर्भात निर्णय घेणार आहे. याबाबतचा शासकीय आदेश लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती कृष्णा खोपडे यांनी दिली.