शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नागपुरातील मंदिरात चोऱ्या करून सजविले स्वत:चे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 11:06 IST

नागपूर, वर्ध्यासह ठिकठिकाणच्या मंदिरात चोऱ्या करून दानपेटीतील रक्कम तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणारा कुख्यात चोरटा दीपक बनसोड याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली.

ठळक मुद्देअट्टल चोर गजाआड २१ गुन्हे उघड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर, वर्ध्यासह ठिकठिकाणच्या मंदिरात चोऱ्या करून दानपेटीतील रक्कम तसेच मौल्यवान चीजवस्तू लंपास करणारा कुख्यात चोरटा दीपक बनसोड याला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली. त्याच्याकडून ठिकठिकाणच्या २१ चोरी-घरफोडीचा पोलिसांनी छडा लावला असून, १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष हे की, चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने, तांब्याच्या मूर्ती, टीव्ही घरात सजवून ठेवत होता.गेल्या काही दिवसांपासून शहरात मंदिरातील दानपेट्या फोडण्याचे, चोरण्याचे गुन्हे वाढले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी मंदिरात चोरी करणाºया सराईत गुन्हेगारांवर नजर रोखली होती. ५ एप्रिलच्या पहाटे नबाबपुरा परिसरातील पातुरकर राममंदिराजवळ कुख्यात बनसोड संशयास्पद अवस्थेत गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलिसांना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो असंबद्ध उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याच्याजवळची बॅग तपासली असता त्यात चोरी-घरफोडी करण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी कटौनी, पेचकस, पेंचीस, टॉर्च तसेच चेहरा लपविण्यासाठी वापरला जाणारा मास्क आढळला. तो ज्या मोटरसायकलवर होता ती मोटरसायकलदेखील त्याने कारंजा येथून चोरून आणल्याचे सांगितले.पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याचा पीसीआर मिळविला. चौकशीत त्याने २९ आणि ३० जानेवारीच्या रात्रीदरम्यान बुधवारी बाजार महालमधील वानरराज हनुमान मंदिरात आरोपी बनसोडने दानपेटीचे कुलूप तोडून नाणी आणि रोख असे एकूण ३५ हजार रुपये चोरून नेले होते. ३० जानेवारीला सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर पुजारी योगेंद्र चंद्रशेखर भोम्बे (रा. महाल) यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर, पीसीआरदरम्यान कुख्यात बनसोडने शहरातील जरीपटका परिसरात ४, धंतोली ३, वाडी २, कोराडी २, नंदनवन २ तसेच गणेशपेठ, इमामवाडा, सक्करदरा, कळमना आणि शांतिनगर परिसरात प्रत्येकी १ तर नागपूर ग्रामीणमधील कळमेश्वरमध्ये १ आणि वर्धा येथील रामनगरातील मंदिरात चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १ लाख ४७ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अडचणीत नोटा, चिल्लर करायचा खर्चआरोपी बनसोड हा चोरी-घरफोडीत मिळालेल्या नोटांचा वापर आधी करायचा. नाणी (चिल्लर) खूपच गरज भासली तर खर्च करायचा. त्याच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी