शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अचलपुरात साखरपुड्याच्या जेवणातून नागरिकांना विषबाधा; ६०च्या वर रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2022 11:53 IST

अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार

नागपूर/अमरावती : अष्टमासिद्धी येथील मंगल कार्यालयात २ डिसेंबर रोजी झालेल्या साखरपुड्याच्या जेवणातून अनेक जणांना दोन दिवसांनंतर विषबाधा झाल्याची घटना रविवारी दुपारी उजेडात आली. ६०च्या वर रुग्णांना उलट्या, मळमळ, हगवण, पोटदुखीचा त्रास झाल्याने रविवारी दुपारी ४ पासून उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. अनेक नागरिक परतवाडा, अचलपूर, नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. लहानग्यांपासून वृद्धांचा समावेश रुग्णांमध्ये आहे.

अचलपूर शहरातील जीवनपुरा येथील माजी नगर उपाध्यक्ष अनिल पिंपळे यांच्या मुलीचा साखरपुडा २ डिसेंबर रोजी अष्टमासिद्धी येथील मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. जीवनपुरा येथील ८००च्या वर नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली व जेवणाचा आनंद घेतला. ३ डिसेंबरपासून अनेकांना मळमळ, हगवण, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ४ डिसेंबरपासून हा त्रास खूप वाढला. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालय गाठले, तर अनेक जण उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. रात्रीपर्यंत उपजिल्हा रुग्णालयात ६० हून अधिक नागरिकांवर उपचार सुरू होता.

यांचा आहे समावेश

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रघुनाथ बीजेवार (७५), शालिक विजयवार (७१), इंद्राबाई गंगभोज (५५), अमोल मेटकर (४४), तुषार गणेश बेदरे (२८), अर्चना वरेकर, सविता वानखडे, यश पवार (१०), नजीर शाह रहमान शाह, प्रकाश रामराव कावरे (६५), मंगेश वऱ्हेकर (४०), ओम वऱ्हेकर (११), दर्शन बोडके (१७), लता राजकुमार देवरे, मितल डिवरे, कोकिळा खोडे (४६), दिलीप पवार (४८), जान्हवी देवरे, विजय कराळे, मधुकर आंबेकर, रुक्मिणी चावरे (४५), रोशनी राहुल शेंद्रे (२७), मीना सुरेश राऊत (५५), बंटी बाबू पिंपळे (१९), ओम संजय पांडे (१४), दीपक श्रीराम घाटे (४०), गजानन सावरकर (१७), अलका बेद्रे (५५), प्रीती बेद्रे (२२), गजानन तायडे (५५), राजा भुसूम (२४), पूजा पांडे (२१), इंदिरा पांडे (४५), अंकिता पिंपळे (१७) भूषण पिंपळे (२०), सविता पिंपळे (५०), दीपक पिंपळे (२६), राम पिंपळे (२०), रोशनी पिंपळे (३५), श्रद्धा पिंपळे (१२), इशिता पिंपळे (७), रिशिका धर्मेंद्र पिंपळे (१७), संगीता दिवटे (२१), रोहन दिवटे (७) या रुग्णांचा समावेश आहे. आणखी रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणे सुरूच असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना डॉक्टर प्रवीण मोरले, चेतन पायरले, प्रियांका कांबळे, तेजस कन्नाके, दीपाली जाधव रुग्णसेवा देत आहेत. विषबाधा पाण्यातून किंवा अन्नातून होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाnagpurनागपूरAmravatiअमरावती