शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पेंचच्या ‘अंडरपास’मधून गेले ५००० वर प्राणी; सर्वाधिक हरीण तर वाघाने केला तब्बल १५१ वेळा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:53 IST

वन्यजीव संस्थेचा अहवाल : या अंडरपासचा सर्वाधिक ३,३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे.

निशांत वानखेडे 

नागपूर : पेंच अभयारण्यामधून जाणाऱ्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वन्यप्राण्यांचा अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेले अंडरपास वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी लाभदायक ठरत आहेत. गेल्या ९ महिन्यात वाघांसह अंडरपासमधून ५००० वर वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या मदतीने हा अहवाल समोर आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणाºया वाहनांखाली येऊन वन्यप्राणी मृत्युमुखी पडण्याच्या घटना नेहमीच घडत टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ १६ किलोमीटरच्या क्षेत्रात २५५ कोटी रुपये खर्च करून चार लहान पूल व पाच अंडरपास तयार करण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांसाठी केली गेलेली ही देशातील सर्वात मोठी खबरदारीची उपाययोजना आहे. यामधून प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने ७८ कॅमेरे लावले आहेत. यातून वन्यप्राण्यांची तब्बल १ लाख ३२ हजार ५३२ छायाचित्रे टिपण्यात आली आहेत. संस्थेच्या अहवालानुसार सर्व अंडरपासमधून ५,२९५ वन्यप्राण्यांनी रस्ता ओलांडला आहे.

या अंडरपासचा सर्वाधिक ३,३२४ वेळा हरणांनी वापर केला आहे. वाघांनी १५१ वेळा अंडरपासमधून रस्ता ओलांडला आहे. यात ११ स्वतंत्र वाघांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय रानडुकरे ७०८ वेळा, ससे ३३९ वेळा, रानमांजर २३६ वेळा, रानकुत्र्यांनी २८१ वेळा अंडरपासचा वापर करून रस्ता ओलांडल्याचे अहवालात नमूद आहे. यांसह नीलगाय, सांभर, गौर, मुंगूस, साळिंदर, वाघाटी, उदमांजर, कोल्हे, बिबट अशा एकूण १७ प्रजातींनी अंडरपासचा उपयोग करून रस्ता ओलांडला.कॅम्पातर्फे ३.५० कोटी : वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील याविषयी अभ्यासाची जबाबदारी देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे सोपवण्यात आली. याअंतर्गत कॅम्पातर्फे साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पेंचचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी दिली.

टॅग्स :TigerवाघNational Highwayराष्ट्रीय महामार्ग