नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असताना सलग चार दिवसांपासून बाधितांची संख्या ३०० वर जात आहे. रविवारी ३१० नव्या रुग्णांची भर पडली, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १३४२७४ झाली असून, मृतांची संख्या ४१५८ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे,
मागील दोन दिवसांपासून शहरात शून्य मृत्यूची नोंद असताना आज एका रुग्णाचा बळी गेला, तर ग्रामीणमध्ये शून्य मृत्यूची नोंद झाली.
नागपूर जिल्ह्यात रविवारी २७६० आरटीपीसीआर, तर ३१८ रॅपिड अँटिजन, अशा एकूण ३०७८ चाचण्या झाल्या. आतापर्यंत शहरात ८१०८३१, तर ग्रामीणमध्ये २५२८६८ चाचण्या झाल्या. यात ६८२७३६ आरटीपीसीआर, तर ३८०९६३ अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरात २५३, ग्रामीणमध्ये ५४, तर जिल्ह्याबाहेरील ३ रुग्ण आहेत. २२५ रुग्ण बरे झाले असून, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.४२ टक्क्यांवर गेले आहे. सध्या ३३३५ रुग्ण उपचाराखाली आहेत. यातील ९४४ रुग्ण रुग्णालयांत, तर २३९१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
-जानेवारी महिन्यात १०५०७ रुग्णांची भर
जानेवारी महिन्यात १०५०७ नव्या रुग्णांची भर पडली, तर २२० रुग्णांचे बळी गेले. डिसेंबर महिन्यात १२००२ रुग्ण व २५८ मृत्यूची नोंद झाली होती. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात रुग्ण व मृत्यूच्या संख्येत घट आली आहे.
-असे वाढले रुग्ण
महिना रुग्ण
मार्च १६
एप्रिल १३८
मे ५४१
जून १,५०५
जुलै५,३९२
ऑगस्ट २९,५५५
सप्टेंबर७८,०१२
ऑक्टोबर १०२७८६
नोव्हेंबर १११७६५
डिसेंबर १२३७६७
जानेवारी १३४२७४
-महिन्यातील मृत्यू
महिना मृत्यू
एप्रिल २
मे ११
जून १५
जुलै ९८
ऑगस्ट ९१९
सप्टेंबर १४०६
ऑक्टोबर ९५२
नोव्हेंबर २६९
डिसेंबर २५८
जानेवारी २२०