शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनपातील थकीत बिलाचा वाद पोलिसात पोहचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 01:14 IST

महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात थकीत बिलावरून अनेकदा वाद निर्माण झाला. परंतु आता महापालिका कंत्राटदार संघटना व कंत्राटदार यांच्यातील वाद पुढे आला आहे. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पोलिसात केले. बिल मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या विरोधात कंत्राटदाराने पोलिसात तक्रार दाखल केली. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली असून प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराची संघटनेच्या प्रमुखाविरोधात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासन व कंत्राटदार यांच्यात थकीत बिलावरून अनेकदा वाद निर्माण झाला. परंतु आता महापालिका कंत्राटदार संघटना व कंत्राटदार यांच्यातील वाद पुढे आला आहे. वाद विकोपाला गेल्याने प्रकरण पोलिसात केले. बिल मिळत नसल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या विरोधात कंत्राटदाराने पोलिसात तक्रार दाखल केली. यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली असून प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.महापालिकेतील कंत्राटदार नागसेन हिरेखण यांचे लाखो रुपयांचे बिल बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे. होळीमुळे कामगार व माल पुरवठादार पैशासाठी त्यांच्या घरी पोहचले. देणी देण्यासाठी तसेच मुलांची फी, स्वत:चा उपचाराचा खर्च कयावयाचा असल्याने बिलातील काही रक्कम मिळावी, अशी मागणी हिरेखण यांनी वित्त विभागाकडे केली. मात्र काही दिवसापूर्वी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर व वित्त अधिकारी नितीन कापडनीस यांचे भेट घेतली होती. त्याचवेळी हिरेखण थकीत बिलासाठी पोहचले. परंतु आयुक्त व वित्त अधिकाऱ्यांनी संघटनेचा हवाला देत क्रमवारीनुसार बिल देण्यात येईल असे सांगितले. यामुळे नाराज झालेले नागसेन हिरेखण यांनी विजय नायडू यांना सुनावले. त्यानंतर मंगळवारी त्यांनी आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. तसेच बुधवारी यासंदर्भात सदर पोलिसात विजय नायडू यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.होळीमुळे देणीदारांची देणी देणे आवश्यक आहे. आयुक्त व वित्त अधिकारी बिल देण्यासाठी सहमत होते. परंतु नायडू यांनी आडकाठी घातल्याने बिल मिळाले नाही. थकीत बिलापैकी काही रकमेचीच मागणी केली होती. कंत्राटदार संघटनेची भूमिका लहान कंत्राटदारांना बाधक आहे. अशा परिस्थितीत या कंत्राटदारांनी संघटितपणे संघटनेच्या विरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. प्रशासन बिल देण्याला तयार असताना संघटनेने यात आडकाठी आणण्याची गरज नसल्याचे हिरेखण म्हणाले.प्रशासनाचाच नियम आहे -नायडूनागसेन हिरेखन वा अन्य लहान कंत्राटदारांची बीले रोखण्याची भूमिका संघटनेची नाही. क्रमारीनुसार बील दिले जात आहे. कंत्राटदार संघटनेच्या सांगण्यानुसार नियम करण्यात आलेले नाही. आयुक्त व वित्त अधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहेत. हिरेखन यांचे आरोप चुकीचे असल्याचे विजय नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPolice Stationपोलीस ठाणे