शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

राग अनावर झाल्याने पत्नीने केली पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 12:27 IST

Nagpur News पत्नीने पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा (खुर्द) येथे घडली असून, पाेलिसांनी आराेपी पत्नीस अटक केली आहे.

ठळक मुद्देआराेपी पत्नी अटकेतचारित्र्यावरील संशयामुळे भांडणे

 

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चारित्र्यावरील संशयामुळे पती-पत्नीमध्ये भांडणे व्हायची. याच कारणावरून दाेघांमध्ये बुधवारी (दि. ११) रात्री भांडण झाले आणि पत्नीने पतीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा (खुर्द) येथे घडली असून, पाेलिसांनी आराेपी पत्नीस अटक केली आहे. न्यायालयाने तिला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे.

सुकलसिंग माखनसिंग सकाेम (४९, रा.खंडाळा खुर्द, ता. काटाेल) असे मृताचे नाव आहे. सुकलसिंग त्याच्या ४४ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची. दाेघांमध्ये याच कारणावरून बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भांडणाला सुरुवात झाली. राग अनावर झाल्याने तिने घरातील काेपऱ्यात पडलेली कुऱ्हाड उचलली आणि सुकलसिंगच्या मानेवर वार केले.

यात सुकलसिंगचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शिवाय, गुन्ह्याची कबुली दिल्याने आराेपी पत्नीला अटक केली. तिला गुरुवारी (दि. १२) दुपारी काटाेल येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. त्यायालयाने तिला दाेन दिवसांची अर्थात शनिवार(दि. १४)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.

तिच्याकडून तिने हत्या करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड व अंगावरील कपडे जप्त केल्याची माहिती तपास अधिकारी तथा पाेलीस उपनिरीक्षक आकाश शाही यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी खंडाळा (खुर्द) येथील उपसरपंच हेमेंद्र चरडे (२९) यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी