शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा प्रकोप होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:11 IST

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. यांच्यात प्राथमिक लक्षण तापाचेच असते. सध्या ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना काळजी घेणे आवश्यक आहे.

रियाज अहमद

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’, चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यू हे चारही वेगवेगळे आजार असले तरी सर्वांमध्ये सुरुवातीचे समान लक्षण म्हणजे ताप हेच आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा प्रकोप बघायला मिळू शकतो. अगोदर शहरात ‘कोरोना’चा संसर्ग दिसून येत आहे. अनेक भाग ‘कन्टेन्मेन्ट झोन’ झाले आहेत. अशा स्थितीत डॉक्टरांसमोर या सर्व आजारांमध्ये नेमका फरक करणे हे मोठे आव्हान आहे. या आव्हानाचा सामना कसा करणार यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना काही वैद्यकीय तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले.‘कोरोना’मध्ये शरीराचे दुखणे कमीमलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या तुलनेत ‘कोरोना’मध्ये तापाच्या स्थितीत शरीराचे दुखणे फारच कमी असते. बाकी आजारांमध्ये शरीराचे दुखणे जास्त असते व थंडीदेखील वाजते. शिवाय ‘कोरोना’त अनेकदा तर रुग्णात लक्षण दिसूनदेखील येत नाही. ताप आल्यानंतर जर शरीराचे दुखणे कमी आहे तर ‘कोरोना’ असू शकतो. जर ज्येष्ठ नागरिक किंवा गंभीर आजाराने पीडित रुग्णाला ताप आला तर त्यांची ‘कोरोना’ चाचणी अत्यावश्यक आहे. अशा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.ताप कमी झाला नाही तर चाचणी आवश्यकवातावरण बदलामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होतात. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. यांच्यात प्राथमिक लक्षण तापाचेच असते. सध्या ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. वातावरण बदलामुळे ताप आला असे तर तीन दिवस त्याचे औषध घेणे गरजेचे आहे. परंतु जर त्यानंतरही आराम पडला नाही तर तातडीने ‘कोरोना’सह इतर चाचण्या केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शहरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल राऊत यांनी केले.इतर आजारात तापासह इतरही लक्षणे‘कोरोना’सह मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारात प्राथमिक लक्षण तापच असतो. मात्र इतर आजारात तापासोबतच इतरही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे फरक केला जाऊ शकतो. चिकनगुनियामध्ये तापासोबतच सांधेदुखी होते तर डेंग्यूमध्ये ताप कमी-जास्त होत असतो व थंडी वाजते. त्यामुळे तापाच्या अवस्थेतच आजारातील फरक कळू शकतो. ‘कोरोना’च्या लक्षणांबाबत नेमकी स्पष्टता अद्यापही नाही. अ़नेकदा तर लक्षणेदेखील आढळत नाही. त्यामुळे जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असे मत डागा इस्पितळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरफान उर्रहीम यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Healthआरोग्य