लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिलच्या सुरुवातीला नागपूर शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. रुग्णांना शहरात बेड मिळत नव्हते. घाटावर अंतिम संस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. या एका महिन्यात ४,२६४९३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तब्बल १,१७८४६ पॉझिटिव्ह आढळून आले; तर १२३३ जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे एप्रिल महिन्यात सर्वाधिक १०००१९ कोरोनामुक्त झाले.
मार्च २०२० मध्ये कोरोना संक्रमणाला सुरुवात झाली. या महिन्यात ९१८ लोकांची चाचणी केली. १६ पॉझिटिव्ह आढळले; पण एकही मृत्यू नव्हता. एप्रिलमध्ये १२१ पॉझिटिव्ह आढळले तर प्रथमच दोघाजणांचा मृत्यू झाला. मे २०२० मध्ये ३५७ पॉझिटिव्ह आढळून आले. आठजणांचा मृत्यू झाला. जून मध्ये ७५० पॉझिटिव्ह आढळले; तर तिघाजणांचा मृत्यू झाला. जुलैमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४०१ पर्यंत पोहोचली. ७० जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला. एका महिन्यात २२९४८ पॉझिटिव्ह आढळले; तर ८७७ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये ३५७४९ पॉझिटिव्ह आढळले. या महिन्यात सर्वाधिक ११५१ जणांचा मृत्यू झाला होता.
वास्तविक, मागील वर्षाचा अनुभव विचारात घेता मुंबईप्रमाणे नागपुरात आरोग्य यंत्रणा सज्ज असती तर कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असता. परंतु उशिरा का होईना, प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
...
१८५१ बेड उपलब्ध
एप्रिल महिन्यात नागपूर शहरात ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हते. रुग्णांची बेडसाठी भटकंती सुरू होती. सेंट्रल कंट्रोल रूम सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांना कोविड रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होण्याला मदत झाली. मंगळवारी १८५१ बेड उपलब्ध होते. यात १६४० ऑक्सिजन, २०३ आयसीयू व व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे.
...
आतापर्यंत २९४७२७ कोरोना मुक्त
आतापर्यंत १८ लाख २२ हजार ८४० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३ लाख २३ हजार ९५ पॉझिटिव्ह आढळून आले; तर ४ हजार ९७५ लोकांचा मृत्यू झाला. दिलासादायक म्हणजे २ लाख ९४ हजार ७२७ जण कोरोनामुक्त झाले.
....
महिना एकूण चाचण्या पॉझिटिव्ह मृत्यू कोरोनामुक्त
मार्च - २० ९१८ १६ ० ४
एप्रिल -२० ५९८६ १२१ २ ३५
मे- २० २१४९१ ३५७ ८ ३१७
जून- २० ३०२०२ ७५० ३ ६४७
जुलै -२० ४४५०८ २४०१ ७० १११३
ऑगस्ट-२० ८०७२३ २२२९४८ ८७७ १३१६०
सप्टेंबर -२० १४९१५८ ३५७४९ ११५१ ३५३०९
ऑक्टोबर-२० १५८९३० १९३७५ ३१२ २६४९८
नोव्हेंबर-२० १३८५३३ १०४०९ १२२ ९२४४
डिसेंबर -२० ११३५३९ ९५९७ १०७ ९८००
जानेवारी - २१ १०६९०३ ८४६३ ८७ ८८८६
फेब्रुवारी- २१ १२७८६० १२९७६ ७७ ८३१३
मार्च - २१ २७५०६० ५९८३१ ४७७ ३८८७२
एप्रिल - २१ ४२६४९३ ११७८४६ १२३३ १०००१९
१ ते १० मे - २१ १४२५३६ २२२५६ ४४९ ४२५१०
एकूण - १८२२८४० ३२३०९८ ४९७५ २९४७२७
...........................