शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

नियमबाह्य ठेवी योजनेचा नागपुरातील सराफांना बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:40 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमबाह्य ठेवी योजना विधेयकास बुधवारी मंजुरी दिल्यानंतर कायदा बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याचा फटका अशा प्रकारच्या योजना चालविणाऱ्या नागपुरातील एक हजारापेक्षा जास्त सराफांना बसणार आहे.

ठळक मुद्देनियमबाह्य ठेवी योजना विधेयकास केंद्राची मंजुरी मासिक हप्तेवारीच्या योजना ‘पोन्झी’

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय मंत्रिमंडळाने नियमबाह्य ठेवी योजना विधेयकास बुधवारी मंजुरी दिल्यानंतर कायदा बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सोन्याचे दागिने खरेदीसाठी ११ मासिक हप्ते भरा आणि १२ वा हप्ता मोफत, यासह अन्य योजना आता या कायद्यांतर्गत पोन्झी अर्थात ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ठरणार आहेत. या कायद्याचा फटका अशा प्रकारच्या योजना चालविणाऱ्या नागपुरातील एक हजारापेक्षा जास्त सराफांना बसणार आहे.केंद्र मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. या कायद्याने एक संस्था स्थापन करण्यात येणार असून, ठेवी स्वीकारणाऱ्या सर्वांनाच या संस्थेकडे नोंदणी करावी लागणार आहे. धडाक्यात सुरू असलेल्या योजनेचा उद्देश ग्राहकांना फायदा देण्याचा नसून केवळ ठेवी गोळा करणे आणि ग्राहकांकडून आगाऊ पैसे घेऊन दागिन्यांची विक्री करणे, एवढाच आहे.योजनेत महिलांची संख्या जास्तसोन्याचे दागिने खरेदी करण्याची प्रत्येकाची हौस असते, पण एवढ्या पैशाची (३०,५०० रुपये तोळा) जुळवाजुळव एकाचवेळी करणे शक्य नसते. या योजनेत नागपुरात श्रीमंत कमी तर सामान्यांची आकडेवारी ९० टक्के आहे. शिवाय पुरुष कमी आणि महिलाच जास्त आहेत. पैशाची जुळवाजुळव करून वर्षाकाठी दागिना खरेदी करताना महिलांनी कॅरेट आणि हॉलमार्क जरूर पाहावा, असे सराफांनी लोकमतला सांगितले.

मध्यंतरी बंदी, नंतर धडाक्यात सुरूग्राहकांना एक महिन्याचा हप्ता मोफत असल्याचे सांगून ११ महिने हप्ते स्वीकारून दागिने विक्रीचे लालच दाखविणे हा एक गुन्हाच आहे. काही सराफा व्यापारी तर १० मासिक हप्ते भरून दोन हप्ते मोफत भरण्याचे लालच दाखवितात. मध्यंतरी सरकारने अशाप्रकारे ठेवी स्वीकारण्यावर प्रतिबंध आणले होते. काही कॉर्पोरेट कंपन्यांनी अशा योजना बंद केल्या होत्या.पण ठोस कायद्याअभावी या योजना देशभरात पुन्हा सुरू झाल्या. आता तर धडाक्यात सुरू आहेत. काही सराफा व्यापारी जास्त व्याजदराचे आमिष दाखवून ग्राहकांकडून ठेवीही स्वीकारत असल्याची बाब पुढे आली आहे. या ठेवींना कुठलेही संरक्षण नसते. १२ वा मासिक हप्ता मोफत देताना ग्राहकांना मिळणारा दागिना किती कॅरेटचा आहे, यावर गंभीर सवाल आहे. ग्राहकांना जास्त किमतीचा दागिने एकाचवेळी खरेदी करणे शक्य नाही आणि त्यांना दरमहा बचतीची सवय जडावी, याकरिता योजना असल्याचे सराफांचे मत आहे.

सराफा शोधतील पळवाटा!नवीन कायदा आला की व्यावसायिक पळवाटा शोधतातच. सराफ व्यावसायिकही तेच करतील. नावे बदलवून नवीन योजना राबवतील. मासिक हप्तेवारीच्य योजना नागपुरात एक हजारापेक्षा जास्त लहानमोठे सराफ व्यावसायिक राबवित आहेत. प्रत्येक सराफाकडे २०० पासून २ हजारांपर्यंत ग्राहक आहेत. या आकडेवारीनुसार नागपुरातील लाखो महिला-पुरुष किमान हजार ते ५-१० हजारांपर्यंत रक्कम सराफांकडे महिन्याकाठी जमा करतात. ग्राहक संख्या आणि रकमेची गोळा-बेरीज केल्यास या योजनेची वार्षिक उलाढाल अब्जावधींच्या घरात आहे. योजनेतील उलाढालीची कुठेही नोंद होत नाही वा कुठलाही कराचा भरणा करण्यात येत नाही. सर्व व्यवहार केवळ कागदावर होत असल्याची माहिती सराफांनी लोकमतशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे योजना राबविणाऱ्या सराफा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :Goldसोनं