शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रभाषा सभा,वोक्हार्टवर १६३ कोटींची थकबाकी

By admin | Updated: February 8, 2017 02:51 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर नागपूर सुधार प्रन्यासने(नासुप्र)

 उच्च न्यायालयाचे वसुलीचे निर्देश : बाजारभावानुसार भूभाटक आकारणी नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर नागपूर सुधार प्रन्यासने(नासुप्र)राष्ट्रभाषा सभा आणि वोक्हार्ट रुग्णालयावर बाजारभावानुसार भूभाटक व तसेच त्यावर व्याज आकारणी करून एकूण १६३ कोटी ७५ लाख ६३ हजार ६८८ रुपयांची थकबाकी काढली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे नियम धाब्यावर बसवून शासकीय जागेचा गैरवापर करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. राष्ट्रभाषा प्रचार समितीला हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नासुप्रने १९६१ मध्ये शंकरनगर येथील अंबाझरी मार्गावरील १.२ एकर जागा पाच हजार रुपयाच्या माफक भाडेपट्टीवर ३० वर्षांसाठी दिली होती. १९९१ मध्ये भाडेपट्टीचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. दरम्यान, २००१ मध्ये राष्ट्रभाषाने या जागेच्या वापरात बदल करण्यासाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता. वास्तविक त्यापूर्वीच येथे दोन इमारती बांधण्याचा करार समितीने प्राजक्ता कन्स्ट्रक्शन कंपनीसोबत केला होता. यात दुसऱ्या विंगमध्ये गाळ्यांचे बांधकाम करून त्याची विक्री करून १ कोटी ३२ कोटी वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गाळ्यांची विक्री करण्यात आली. दरम्यान, जागेच्या वापरातील बदलासाठी करण्यात आलेले अर्ज नासुप्र, महापालिका व नगररचना विभागांनी फेटाळून लावले होेते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र लिहून जमिनीचा वापर बदलण्यासाठी नव्याने भाडेपट्टा करण्याची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सचिवांना तसे आदेश दिले. त्यानुसार नासुप्रने ठराव मंजूर केला होता. परंतु हा ठराव मंजूर होण्यापूर्वीच समितीने एसएमजी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत करार करून ६ कोटी ३० लाख रुपयात बी-विंगची जागा विकली. त्यानंतर एसएमजी हॉस्पिटलने त्रिपक्षीय करार करून वोक्हार्ट हॉस्पिटल प्रा. लि.कंपनीसोबत वार्षिक उत्पन्नाच्या ३३ टक्के भागीदारीवर जागेचे हस्तांतरण करण्यात आले. अशाप्रकारे शासनाची वेळोवेळी दिशाभूल करण्यात आली. अशा आरोपाची जनहित याचिका सिटीझन फोरम फॉर इक्विलिटी या संस्थचे अध्यक्ष मधुकर कुकडे यांनी दाखल केली होती. न्यायमूर्ती भूषण धर्माधकारी यांच्या खंडपीठाने ७ सप्टेंबरला यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यानुसार १९९१ पासून २०१७ पर्यंत या जागेवर बाजारभावानुसार भूभाटक आकारून त्यावर १२ टक्के व्याज लावण्याचे आदेश नासुप्रला देण्यात आले होते. त्यानुसार नासुप्रने महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा तसेच इमारतीतील एसएमजी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड व वोक्हार्ट हॉस्पिटल व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.(प्रतिनिधी)