शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

हमारा गाव, हमारा राज!

By admin | Updated: June 23, 2014 01:20 IST

आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन

आदिवासी निर्धार मेळावा : मधुकर पिचड यांचे आवाहननागपूर : आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी केले.आदिवासी समाज संयुक्त कृती समितीतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित आदिवासी निर्धार व प्रबोधन मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात पिचड बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेवराव उसेंडी, केवलराम काळे आदी उपस्थित होते.मागासलेपणा व संस्कृती या आधारावर घटनेने आदिवासींना आरक्षण दिले आहे. आरक्षण देताना प्रत्येक राज्याची परिस्थिती व संस्कृती विचारात घेतली जाते. कर्नाटक व केरळ राज्यात मराठा समाजाचा आदिवासीत समावेश आहे. उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश आहे. या आधारावर त्यांना महाराष्ट्रात आरक्षण देणार का? असा सवाल पिचड यांनी केला.आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. परंतु आदिवासींच्या आरक्षणात दुसऱ्यांचा वाटा आम्ही खपवून घेणार नाही. आदिवासी पेटला तर महाराष्ट्रही पेटेल याचा राज्यातील ७८ विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल, असा इशारा पिचड यांनी दिला. मताच्या राजकारणासाठी आदिवासींचा बळी देऊ नका, बोगस आदिवासींचे अतिक्र मण थोपविण्यासाठी आदिवासींनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाच्या हक्कासाठी आम्ही प्राणांचीही पर्वा करणार नाही. वाट्याला जाणाऱ्यावर आदिवासींचे हात उठतील असा इशारा वसंत पुरके यांनी दिला. देशात दहा कोटी तर राज्यात सव्वाकोटी आदिवासी आहे. लोकसंख्येचा विचार करता आदिवासींना १० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे. २२ जातींचा आदिवासीत समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आहे. याऐवजी त्यांनी वेगळ्या सवलती मागण्याला आमचा विरोध नाही. आदिवासी हक्कासाठी संघटित होणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नसल्याचे शिवाजीराव मोघे म्हणाले.काही राजकीय नेते बोगस आदिवासींना आरक्षणाचे आश्वासन देत आहेत. याचा समाजाने विरोध करावा, असे आवाहन पद्माकर वळवी यांनी केले. मारोतराव क ोवासे, आमदार आनंदराव गेडाम, नामदेव उसेंडी, केवलराम काळे यांच्यासह माजी महापौर माया इवनाते, पुष्पाताई आत्राम, सुखदेव पारधी, दिलीप मडावी, ज्ञानेश्वर मडावी, मणिराम मडावी आदींनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला आदिवासी संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)