शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमचा जाहीरनामा ; जीएसटी १८ टक्क्यांच्या आत आणून सुटसुटीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 09:57 IST

जीएसटी कमाल १८ टक्क्यांवर आणून अन्य करप्रणाली सुटसुटीत करून व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करण्याची संधी द्यावी. याशिवाय व्यापारी हितार्थ मागण्यांचा समावेश राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात करावा अशी मागणी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जीएसटी कमाल १८ टक्क्यांवर आणून अन्य करप्रणाली सुटसुटीत करून व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करण्याची संधी द्यावी. याशिवाय व्यापारी हितार्थ मागण्यांचा समावेश राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात करावा अशी मागणी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी यांनी केली आहे. देशात जीएसटीची घोषणा आणि जास्त कर टप्प्याच्या अंमलबजावणीने उद्योजक आणि व्यापारी त्रस्त होते. त्यानंतर त्यात सुधारणा करून २८ टक्क्यांवरील कर टप्प्यातील काही वस्तूंना १८ टक्के दराच्या टप्प्यात आणले. पण अजूनही २८ टक्के करटप्पा व्यापाऱ्यांसाठी बोझा ठरत आहे.व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापारी करण्याची संधी मिळावी, अशी देशातील व्यापारी संघटनांची मागणी आहे. पण तसे होताना दिसत नाही. जीएसटी लागू केला तेव्हा महिन्याचे तीन रिटर्न, न भरल्यास त्यावर दंड आणि अनेकविध तरतुदींच्या बोझ्याखाली व्यापारी दबला आहे. व्यापारी कर भरण्यास तयार आहे. पण सर्व प्रक्रिया सुटसुटीत केली तर व्यापारी स्वमर्जीने कर भरण्यास पुढे येईल आणि शासनाच्या तिजोरीत जास्त महसूल गोळा होईल. त्यामुळे राजकीय पक्षांचा जाहीरनामा हा व्यापारी हितार्थ आणि व्यापाऱ्यांतर्फे स्वागत होईल, असा असायला पाहिजे. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, असा पक्षांचा जाहीरनामा असू नये. याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट देणाऱ्या घोषणा जाहीरनाम्यात असाव्यात.उद्योजकांना जमीन खरेदी करताना वा विकताना रेडिरेकनरच्या भावात जागेची रजिस्ट्री करावी लागते. बँकांनी नवउद्यमींसाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करून द्यावेत. याशिवाय उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांचा जाहीरनाम्यात राजकीय पक्षांनी समावेश करावा असे ते पुढे म्हणाले.

टॅग्स :GSTजीएसटी