ओटीपी शेअर करणे महागात पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:09 AM2021-01-17T04:09:41+5:302021-01-17T04:09:41+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : परीक्षा शुल्क भरून त्याची पावती देण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यास ७५ हजार रुपयांनी फसविण्यात आले. ही ...

OTP sharing became expensive | ओटीपी शेअर करणे महागात पडले

ओटीपी शेअर करणे महागात पडले

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : परीक्षा शुल्क भरून त्याची पावती देण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यास ७५ हजार रुपयांनी फसविण्यात आले. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकाडी येथे घडली.

शिवनाथ प्रसाद पांडे (४५, रा. न्यू टेकाडी काॅलनी, ता. पारशिवनी) हे कर्मचारी असून, त्यांना त्यांच्या माेबाईलवर निनावी फाेन काॅल आला. त्यांना भारतकाेश कस्टमर केअर सेंटरमधून बाेलत असल्याचे सांगण्यात आले. डीजीएमएस संचालक परीक्षेचा शुल्क भरून त्याची रीतसर पावती देण्याची बतावणी करण्यात आली.

यावर शिवनाथ पांडे यांनी विश्वास ठेवला आणि माेबाईलवर संबंधिताने दिलेल्या सूचनेनुसार ॲप डाऊनलाेड केले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने शिवनाथ पांडे यांना प्राप्त झालेला ‘ओटीपी’ विचारला. त्यांनी ही गोपनीय माहिती त्या अनाेळखी व्यक्तीला फाेनवरून दिली. त्या व्यक्तीने या‘ओटीपी’चा वापर करीत शिवनाथ पांडे यांच्या भारतीय स्टेट बॅंकेच्या कन्हान शाखेतून आधी ५० हजार रुपये व नंतर २५ हजार रुपये अशा एकूण ७५ हजार रुपयांची परस्पर उचल केली. या व्यवहारात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामटेके करीत आहेत.

Web Title: OTP sharing became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.