शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ मराठी विभागाच्या हीरक महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्र रंगणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हीरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जानेवारी रोजी होणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान मराठी भाषा संरक्षणावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले हे या महोत्सवाचे उद्घाटन करतील, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी दिली.यासंदर्भात नागपूर विद्यापीठात पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रपरिषदेला माजी विभागप्रमुख व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. अनिल नितनवरे, डॉ. कोमल ठाकरे, डॉ. प्रमोद मुनघाटे, माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते. ६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता गुरू नानक भवन येथे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात होईल.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम उपस्थित राहतील. यावेळी माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ विचारवंत-समीक्षक डॉ. यशवंत मनोहर यांचा अमृत महोत्सवानिमित्त जाहीर सत्कार करण्यात येईल तसेच माजी विद्यार्थ्यांच्या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात येईल.सायंकाळी ५ वाजता डॉ. रमेश अंधारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘ते दिवस...ते क्षण’ या कार्यक्रमाचे आयोजन होईल. यात डॉ. राजन जयस्वाल, डॉ. हेमंत खडके, डॉ. अलका गायकवाड, डॉ. देवानंद सोनटक्के हे उपस्थित राहतील.हीरक महोत्सवाचाच एक भाग म्हणून रविवार, ७ जानेवारी २०१८ ला सकाळी ९.३० वाजता ‘मराठी भाषा : संरक्षणाच्या व संवर्धनाच्या दिशा’ या विषयावर ग्रामगीता भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.सुविख्यात अभ्यासक प्रा. हरी नरके हे चर्चासत्राचे अध्यक्ष राहतील. तर सकाळी ११.३० वाजता ‘अभिजात मराठी भाषा : प्राचीनता, अखंडता व श्रेष्ठता’ या विषयावर डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. मोना चिमोटे यांच्या उपस्थितीत परिसंवाद होईल. तर दुपारी २.३० वाजता ‘सद्य:कालीन मराठी भाषा : स्वरूप व विकासाच्या दिशा’ या विषयावर प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉ. विद्या देवधर, सूचिकांत वनारसे यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ