शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयासह आयोजकाला दंड  : मनपाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:02 IST

Organizer of wedding hall fined विना अनुमती विवाह समारंभ आयोजनाला परवानगी दिल्या प्रकरणी सोमवारी नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहाचे संचालक व विवाह समारंभ आयोजक यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला.

ठळक मुद्देविवाह समारंभातील गर्दी भोवली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. ९ नवीन हॉट स्पॉट निर्माण झाल्याने मनपा प्रशासनाची झोप उडाली आहे. कोविड नियंत्रणासाठी बाधितांचा सर्वे करण्यासोबतच स्क्रिनिंग व बाधितांना उपचारासाठी पाठविले जात आहे. अशा परिस्थितीत मंगल कार्यालय , लॉन, सभागृहात विना अनुमती समारंभ आयोजित केल्यास व नियमाचे उल्लघन केल्यास सील करण्याचा इशारा मनपा आयुक्त राधाकृसन बी. यांनी दिला होता. असे असतानाही विना अनुमती विवाह समारंभ आयोजनाला परवानगी दिल्या प्रकरणी सोमवारी नरेंद्र नगर येथील तुकाराम सभागृहाचे संचालक व विवाह समारंभ आयोजक यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारला.

लग्न समारंभाला १०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असताना तुकाराम सभागृहात आयोजित लग्न समारंभाला २५० हून अधिक लोक उपस्थित होते. निर्धारित संख्येपेक्षा जास्त लोक असल्याने आयोजकांना पाच हजार तर सभागृहावर ५ हजारांचा दंड आकारण्यात आला. उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी विवाह समारंभाला अनुमतीपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती असल्याची माहिती धंतोली झोनचे प्रमुख नरहरी बिरकड व अरविंद लाडेकर यांना दिली. तसेच धंतोली झोनचे सहायक आयुक्तांना याची सूचना दिली. त्यानंतर नियमानुसार संबंधित सभागृहावर १० हजार दंड आकारला होता. मात्र नियमानुसार पहिल्या वेळी ५ हजार दंड आकारता येतो. त्यामुळे सभागृह व आयोजक यांच्यावर प्रत्येकी ५ हजारांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती तांबे यांनी दिली.

दिली.

....

तर मंगल कार्यालये होणार सील

१६ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. या दिवशी मोठ्या संख्येत लग्न समारंभ आहेत. लग्न समारंभामध्ये सर्रासपणे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. अशी ठिकाणे कोरोना संसर्गाचे हॉट स्पॉट ठरण्याचा धोका जास्त असतो. याचा विचार करता शासनाद्वारे निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या मंगल कार्यालय, लॉन आदी ठिकाणी आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय, लॉन सील करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार शोध पथकाने प्रत्येक मंगल कार्यालय, लॉन वर नजर ठेवली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका