शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘हुंकार’ सभेसाठी एकवटल्या संघ परिवारातील संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:27 IST

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलुरू तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंघाचे पदाधिकारी मंचावर राहणार का ? तरुणाईला जोडण्याचा प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलुरू तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी संघ परिवारातील संघटनांनी कंबर कसली आहे. या सभेत विविध संत सहभागी होणार आहेत. मात्र मंचावर संघाचे पदाधिकारी राहणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.राममंदिरासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी अयोध्या, बंगळुरू व नागपुरात हुंकार सभा होणार आहेत. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने येथून देशात संदेश जाणार आहे.२५ नोव्हेंबर रोजी हनुमान नगर येथील क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात ही सभा होणार आहे. या सभेत शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, साध्वी ऋतुंभरा देवी, श्रीदेवनाथ मठ (सुर्जी-अंजनगाव) श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज तसेच विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष आलोककुमार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.मात्र या सभेला मंचावर संघाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित राहतील की नाही हा प्रश्न आहे. याबाबत संयोजकांनीदेखील नेमकी भूमिका उघड केलेली नाही.तरुणाईवर जास्त भरया ‘हुंकार’ सभेला तरुणाई जास्तीत जास्त प्रमाणात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अभाविप, भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. दररोज विविध पातळ्यांवर बैठका सुरू आहेत व दररोज तयारीचा आढावा घेण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे शहरातील विविध मंदिरांच्या परिसरातदेखील जागरण सत्र आयोजित करण्यात येत आहे.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिर