शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे २४ व २५ ला आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 10:29 IST

नागपुरात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देडॉ. वि.स. जोग अध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्यावतीने द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. वि. स. जोग हे संमेलनाचे अध्यक्ष राहणार आहेत. आयोजन समितीच्या कांचनताई गडकरी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली.विदर्भ साहित्य संघ, सांस्कृतिक संकुल येथे आयोजित साहित्य संंमेलनाचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उदघाट्न करण्यात येईल. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन या संमेलनाचे उदघाट्न करणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर प्रामुख्याने उपस्थित राहतील. तत्पूर्वी सकाळी १० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. स्वा. सावरकरांच्या विचारातील सार्थकतेचा शोध घेऊन नव्या भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा घेण्यास्तव हे दोन दिवसीय वाड्मयीन विचारमंथन होणार असल्याचे त्या म्हणाल्या. दुपारी २ वाजता ‘सावरकरांचे वाड्मयविश्व’ या परिसंवादाने विचारमंथनाला सुरुवात होणार आहे.प्रसिद्ध साहित्यिक व कलावंत डॉ. वीणा देव या परिसंवादाच्या अध्यक्ष राहणार असून प्रकाश एदलाबादकर, डॉ. श्याम धोंड व तीर्थराज कापगते हे विचार मांडतील. त्यानंतर ‘एकात्मता, समरसता व सावरकर’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाची मैफिल सजणार आहे.२५ फेब्रुवारीला प्रेरणा लांबे यांच्या ‘मी येसू बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाने दुसऱ्या दिवशीचे सत्र सुरू होईल. त्यानंतर विविध विषयावर परिसंवाद होतील. यादरम्यान शिवकथाकर विजयराव देशमुख यांचा सत्कार करण्यात येईल. प्रा. विवेक अलोणी यांनी संपादन केलेल्या ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकाचे विमोचन करण्यात येणार असल्याचे कांचन गडकरी यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, महासचिव डॉ. अजय कुळकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन