शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रीट एलईडी लॅम्पस् पुरवठादारांची बिले थांबविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:28 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्ट्रीट एलईडी लॅम्पस् पुरवठादारांची बिले थांबविण्याचा आदेश दिला. त्यामुळे महापालिकेला जोरदार दणका बसला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणका : ‘लोकमत’ने लावून धरला होता विषय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्ट्रीट एलईडी लॅम्पस् पुरवठादारांची बिले थांबविण्याचा आदेश दिला. त्यामुळे महापालिकेला जोरदार दणका बसला आहे.महापालिकेने शहरातील रोडवर लावण्यासाठी चक्क ९,९०० रुपये नगाप्रमाणे एलईडी लॅम्पस् खरेदी केले आहेत. यासंदर्भात उच्च न्यायालयाची स्वत:ची व अ‍ॅड. अभियान बाराहाते यांची अशा दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकांवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक तथ्ये लक्षात घेता, स्ट्रीट एलईडी लॅम्पस् पुरवठादारांची बिले थांबविण्याचा आदेश दिला. तसेच, महापालिका आयुक्त, महापौर, खरेदी समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांना नोटीस बजावून यावर ११ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. हा विषय ‘लोकमत’ने लावून धरला होता, हे येथे उल्लेखनीय.महापालिकेने बाजारात अवघ्या ३,४०० रुपये नगाप्रमाणे मिळू शकणारे स्ट्रीट एलईडी लॅम्पस् चक्क ९,९०० रुपये दराने खरेदी केले आहेत. असे १ लाख ३८ हजार एलईडी लॅम्पस् खरेदी केले जाणार असल्यामुळे हा तब्बल १०० कोटीवर रुपयांचा उच्चस्तरीय भ्रष्टाचार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत या व्यवहाराची धक्कादायक माहिती मिळविली आहे. या खरेदी व्यवहाराचा संपूर्ण रेकॉर्ड न्यायालयात सादर करण्यात यावा, मनपा खरेदी करणार असलेले एलईडी लॅम्पस् व बाजारात उपलब्ध असलेले एलईडी लॅम्पस् यांची गुणवत्ता व किमतीची तज्ज्ञांमार्फत तुलना करून अहवाल मागविण्यात यावा व या गैरव्यवहारात सामील व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे व अ‍ॅड. अमृता गुप्ता यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे