शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातावर अहवाल देण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 01:10 IST

बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यावर अहवाल देण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. तसेच, मंडळामध्ये मेयोचे अधिष्ठाता, बालरोग विभाग प्रमुख, प्रसुती विभाग प्रमुख व रेडिओलॉजी विभाग प्रमुख यांचा समावेश करण्यास सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्ट : बलात्कार पीडित महिलेला हवीय परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बलात्कारामुळे धारण झालेला गर्भ पाडण्यावर अहवाल देण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. तसेच, मंडळामध्ये मेयोचे अधिष्ठाता, बालरोग विभाग प्रमुख, प्रसुती विभाग प्रमुख व रेडिओलॉजी विभाग प्रमुख यांचा समावेश करण्यास सांगितले.पीडित महिला व्यवसायाने घर कामगार व बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असून मालकाने वारंवार बलात्कार केल्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. ती आधीच दोन मुलांची आई आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, तिला गर्भ तपासणीकरिता बुधवारी सकाळी ११ वाजता वैद्यकीय मंडळासमक्ष हजर व्हायचे आहे. त्यानंतर मंडळाला दुपारी २.३० वाजतापर्यंत अहवाल तयार करून तो न्यायालयात सादर करायचा आहे. पीडित महिलेच्या पोटातील गर्भ ३० आठवड्यांचा झाला आहे. कायद्यानुसार, २० आठवड्यांवरील गर्भ पाडता येत नाही. डॉक्टर्सनी गर्भपात करण्यास नकार दिल्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. तिने न्यायालयाकडे गर्भपाताची परवानगी मागितली आहे.असे आहे प्रकरणपीडित महिलेप्रमाणे आरोपीदेखील दोन अपत्यांचा बाप आहे. पीडित महिला त्याच्या घरात सकाळी ६ ते १० या वेळात ३५० रुपये हप्त्याप्रमाणे काम करीत होती. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी आरोपीने महिलेला कार्यालयाची साफसफाई करण्यास सांगितले. दरम्यान, त्याने महिलेच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे महिलेने काम सोडून दिले. दोन दिवसानंतर आरोपीचा मुलगा व सून महिलेला समजावण्यासाठी गेले व त्यांनी महिलेला कामावर परत येण्यास राजी केले. त्यानंतर आरोपीने पुन्हा महिलेवर बलात्कार केला व त्याची वाच्यता कुठे केल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली. घटनेच्या दोन महिन्यांनंतर महिलेने धाडस करून आरोपीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. परंतु, त्यांनी महिलेच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाही व तिला जबर मारहाण केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRapeबलात्कार