शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : मेळघाट जंगलात शिरलेल्या गावकऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:45 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, वन विभागाचे सचिव, अमरावती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, अकोला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आणि चिखलदरा पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देजंगलातील गावात बळजबरीने प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावात बळजबरीने प्रवेश केलेल्या पुनर्वसित गावकऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करून दोन आठवड्यात अहवाल सादर करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. तसेच, राज्याचे मुख्य सचिव, वन विभागाचे सचिव, अमरावती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, अकोला जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक आणि चिखलदरा पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गावकऱ्यांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी विजयसिंग चव्हाण यांनी याचिका दाखल केली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावकऱ्यांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. ते गावकरी बळजबरीने मूळ गावात शिरले आहेत. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे सुमारे ६० पोलीस व वन कर्मचारी गंभीर जखमी झाले. तसेच, झटापटीमध्ये काही गावकरीही जखमी झाले. योग्य भरपाई मिळाली नाही व पुनर्वसन योग्य झाले नाही, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आकाश मून तर, सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMelghat Tiger Reserve Forestमेळघाट व्याघ्र प्रकल्प