शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : निकृष्ट सुपारी आयातीचा सीबीआयमार्फत तपास करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:26 IST

भारतामध्ये निकृष्ट सुपारी आयात करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांना बुधवारी जोरदार दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत सखोल तपास करण्यात यावा असा आदेश केंद्र व राज्य सरकारला दिला. तसेच, महसूल गुप्तचर संचालकांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ‘सीबीआय’ला हस्तांतरित करावीत असे सांगितले. एवढेच नाही तर, यापुढे भारतामध्ये निकृष्ट सुपारीची आयात होऊ नये याकरिता १५ दिवसांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देशही दिलेत.

ठळक मुद्देआयात थांबविण्यासाठी दिली १५ दिवसांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतामध्ये निकृष्ट सुपारी आयात करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यापाऱ्यांना बुधवारी जोरदार दणका बसला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणाचा ‘सीबीआय’मार्फत सखोल तपास करण्यात यावा असा आदेश केंद्र व राज्य सरकारला दिला. तसेच, महसूल गुप्तचर संचालकांनी यासंदर्भातील सर्व कागदपत्रे ‘सीबीआय’ला हस्तांतरित करावीत असे सांगितले. एवढेच नाही तर, यापुढे भारतामध्ये निकृष्ट सुपारीची आयात होऊ नये याकरिता १५ दिवसांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देशही दिलेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात सी. के. इन्स्टिट्यूट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. मेहबूब चिमठाणवाला यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. भारतीय अन्न सुरक्षा व माणके प्राधिकरणने भारतामध्ये आयात झालेल्या सुपारीचे नागपूर व गोंदिया येथून नमुने गोळा केले होते. रासायनिक तपासणीमध्ये संबंधित सुपारी आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे आढळून आले. भारतात इंडोनेशियातून निकृष्ट सुपारी आयात केली जाते. ती सुपारी रोड व अन्य मार्गाने भारतात आणली जाते. अशी सुपारी बाजारात सर्रास विकली जात असल्यामुळे कर्करोग व अन्य गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. याशिवाय छुप्या पद्धतीने सुपारी आयात केली जात असल्यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. न्यायालयाने वरील आदेश देण्यापूर्वी यासह विविध बाबी लक्षात घेतल्या. या प्रकरणात अ‍ॅड. आनंद परचुरे न्यायालय मित्र असून याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग