शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : केरळ पूरपीडितांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे चार अधिकाऱ्यांना केरळ पूरपीडितांस प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्याचा आदेश दिला. एका कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मंजूर केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हा दणका देण्यात आला.

ठळक मुद्देपाटबंधारे महामंडळाच्या चार अधिकाऱ्यांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे चार अधिकाऱ्यांना केरळ पूरपीडितांस प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्याचा आदेश दिला. एका कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पाचे कंत्राट मंजूर केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हा दणका देण्यात आला.महामंडळाचे कार्यकारी संचालक, गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व नागभीड तालुक्यातील घोडाझरी कॅनल विभागाचे कार्यकारी अभियंता यांना हा आदेश देण्यात आला. केरळ मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीमध्ये प्रत्येकी एक लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे जमा करावेत व या आदेशाचे पालन झाल्याचे वेगवेगळे प्रतिज्ञापत्र एक महिन्यात सादर करण्यात यावे, असे न्यायालयाने अधिकाऱ्यांना सांगितले.घोडाझरी कॅनल विभागांतर्गतचे एक कंत्राट हैदराबाद येथील आर. आर. कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया कंपनीला देण्यात आले होते. त्याविरुद्ध प्रतिस्पर्धी कंत्राटदार अनोज अग्रवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आर. आर. कन्स्ट्रक्शनला अवैधपणे कंत्राट देण्यात आले. या कंपनीने कंत्राट प्रक्रियेतील अनिवार्य अटींचे काटेकोर पालन केले नाही असे त्यांचे म्हणणे होते. प्रकरणातील तथ्यांचे अवलोकन केल्यानंतर न्यायालयाला त्यांच्या दाव्यात तथ्य आढळून आले. त्यामुळे न्यायालयाने आर. आर. कन्स्ट्रक्शनला कंत्राट देण्याचा वादग्रस्त निर्णय रद्द केला, पण जनहित लक्षात घेता थेट नवीन कंत्राट प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला नाही. अनोज अग्रवाल हे ३९ कोटी १५ लाख ६९ हजार ७३७ रुपयांपेक्षा कमी रकमेत काम करण्यास तयार असल्यास त्यांना हे कंत्राट देण्यात यावे. ते तयार नसल्यास आर. आर. कन्स्ट्रक्शनला बोलावून ते या रकमेत काम करण्यास तयार आहेत का हे विचारावे आणि दोघांचीही या रकमेत हे काम करण्याची इच्छा नसल्यास नवीन कंत्राट प्रक्रिया राबविण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने पाटबंधारे महामंडळाला दिलेत.नवीन निविदा प्रक्रियेचा खर्च अधिकाऱ्यांकडून वसूल कराराज्याच्या मुख्य सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी व या कंत्राटासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवावी लागल्यास त्यावर येणारा संपूर्ण खर्च दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावा, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. आर. आर. कन्स्ट्रक्शनला एकतर्फी पद्धतीने कंत्राट देण्यात आले. कंत्राट प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. अपारदर्शी पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात आली, असे निरीक्षण न्यायालयाने निर्णयात नोंदविले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. प्रकरणावर १६ आॅगस्ट रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा व अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKerala Floodsकेरळ पूर