शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : मेयोमध्ये एमआरआय युनिट स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 19:18 IST

शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला १२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी या कामासाठी अधिक विलंब करू नका असे बजावून मेयोमध्ये दोन महिन्यांमध्ये एमआरआय युनिट स्थापन करण्याचा आदेश सरकारला दिला.

ठळक मुद्देशिर्डी देवस्थानने दिले १२ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला १२ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी या कामासाठी अधिक विलंब करू नका असे बजावून मेयोमध्ये दोन महिन्यांमध्ये एमआरआय युनिट स्थापन करण्याचा आदेश सरकारला दिला.मेयोमध्ये १९८६ पासून सुरू असलेल्या ‘डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ डायग्नोसिस’ अभ्यासक्रमाला मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची मान्यता नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. मेयोमध्ये एमआरआय युनिट स्थापन केल्याशिवाय या अभ्यासक्रमाला मान्यता देण्यात येणार नाही असे कौन्सिलने स्पष्ट केले आहे. असे असले तरी कौन्सिलने एम.डी. (रेडियोलॉजी) अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. कौन्सिलच्या या भेदभावपूर्ण धोरणावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. न्यायालयाने प्रकरणावर प्राथमिक सुनावणी केल्यानंतर कौन्सिल व राज्य सरकारला नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सरकारने न्यायालयात उत्तर दाखल करून शिर्डी येथील साईबाबा देवस्थानने मेयोमध्ये एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी १२ कोटी रुपयांची देणगी दिल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात जीआर जारी करण्यात आल्याची माहिती दिली. परिणामी, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी वरीलप्रमाणे आदेश देऊन प्रकरणावर आठ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी तर, सरकारच्या वतीने अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)