शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ऑरेंज फेस्टिव्हल; कुकिंग स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाच विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 10:45 IST

वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने नामांकित शेफ गौतम मेहऋषी यांचा कुकिंग वर्कशॉप २१ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने नामांकित शेफ गौतम मेहऋषी यांचा कुकिंग वर्कशॉप २१ जानेवारीला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात दुपारी १२ ते ३ पर्यंत होणार आहे. यात डेझर्ट आणि प्लेटिंगचा समावेश राहील. अंतिम स्पर्धेत विजेत्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ आणि १८ जानेवारीला नागपुरातील विविध हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये होणार आहे. पहिली फेरी १७ रोजी गोधनी येथील तुली कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट येथे प्राथमिक फेरी घेण्यात आली. ७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात प्रज्ज्वल भीमराव मेश्राम, अंकुश कुंदन बर्मन, संजय भूषण वर्मा, स्नेहा नंदलाल चांडक, गुंजन दिनेश दांडेकर या पाच विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. परीक्षकाची भूमिका संचालिका डॉ. उर्वशी यशोरॉय, प्राचार्य शैलेंद्रकुमार चिकटे आणि सहायक प्राध्यापक प्रज्ञा टेंभुर्णीकर यांनी बजावली.आज दोन कॉलेजमध्ये प्राथमिक फेरीकुकिंग स्पर्धेची दुसरी प्राथमिक फेरी १८ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता कडबी चौक, मंगळवारी येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी येथे होणार आहेत. २०० पेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत भाग घेणार आहे. तसेच १८ रोजी दुपारी २.३० वाजता सदर येथील बाळासाहेब तिरपुडे कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी स्पर्धेची फेरी होणार आहे. दोन्ही फेरीत प्रत्येक महाविद्यालयातील पाच-पाच विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल