शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

ऑरेंज सिटी स्ट्रीट : 'आरएनसी प्लांट'साठी वर्षभरानंतर दिली जात आहे जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:20 IST

ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प १५ महिन्यात पूर्ण होणार होता, त्याच्या आरएमसी प्लँटसाठी १२ महिन्यानंतर म्हणजेच वर्षभरानंतर मनपाची जमीन भाड्याने देण्याची तयारी कशी काय केली जात आहे.

ठळक मुद्दे५.५० कि.मी. रस्त्याचे सिमेंटीकरण १५ महिन्यात पूर्ण करायचे होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर एखाद्यावर मनपा सत्तापक्ष व प्रशासनाची मेहरबानी असेल तर काहीही होऊ शकते. असेच काहिसे ऑरेंज सिटी स्ट्रीट मार्गाच्या सिमेंटीकरणाच्या कामात होत आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मधुकोन प्रोजेक्टा पंचदीपनगर चौक ते जयताळा दरम्यान ५.५० कि.मी. रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम देण्यात आले होते. १५ महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते. परंतु मधुकोन कंपनीला संबंधित प्रकल्पासाठी ७ हजार वर्गफूट जमीन १.३८ लाख रुपये प्रति माह भाड्याने काँक्रिट रेडी मिक्स (आरएमसी) प्लांट)साठी देण्याचा प्रस्ताव पुढील स्थायी समितीच्या बैठकीत येत आहे. तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, जो प्रकल्प १५ महिन्यात पूर्ण होणार होता, त्याच्या आरएमसी प्लँटसाठी १२ महिन्यानंतर म्हणजेच वर्षभरानंतर मनपाची जमीन भाड्याने देण्याची तयारी कशी काय केली जात आहे. ही जमीन ११ महिन्यासाठी मागण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम अजून किमान ११ महिने तरी पूर्ण होणार नाही, हे निश्चित.मधुकोन प्रोजेक्टला हे काम ५३.१० कोटी रुपयात मुख्यमंत्र्यांच्या विशेष फंडातून देण्यात आले होते. अगोदर चार महिन्यात जयताळाकडून जवळपास एक किमी रस्ता खोदून संंबंधित कंपनीने तसाच सोडून दिला. यावर लोकमतने वृत्त प्रकाशित करून ही बाब निदर्शनासही आणून दिली होती. यानंतर कामाला थोडी गती मिळाली. परंतु लेटलतिफीमुळे संबंधित रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे लखनौ-मुजफ्फरपूर नॅशनल हायवे प्रकल्पाचे काम संथ गतीने केल्याबद्दल आणि इतर अनियमितेतमुळे वर्ल्ड बँकने २६ आॅक्टोबर २०१७ रोजी या कंपनीला दोन वर्षासाठी डीबार केले होते. या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेकडून निधी प्राप्त झाला होता.एनएचएआयने सुद्धा एका प्रकल्पात संथ गतीने काम केल्या प्रकरणात कारवाई केली होती. तरीही मनपाने इतक्या मोठ्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम कंपनीला देण्यात आले. प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनाही या प्रकरणाची माहिती होती. यामुळे मनपा प्रशासन व पदाधिकाऱ्यांची कृपा ज्या कंपनीवर झाली, त्यावर मेहरबानी कायम राहते.ऑरेंज सिटी स्ट्रीटला अजूनही गती नाहीवर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा या दरम्यान ३०.४९ हेक्टर क्षेत्रफळात ऑरेंज सिटी स्ट्रीटचे बांधकाम करावयाचे आहे. वर्धा रोडपासून सीआरपीएफ दरम्यान हा स्ट्रीट मौजा सोमलवाडा, खामला, भामटी, टाकळी, जयताळा असा एकूण २१ भूखंडांमध्ये विभागला आहे. जयप्रकाशनगर चौकातच स्ट्रीट अंतर्गत मेट्रो मॉलचे बांधकाम केले जात आहे. याचे काम मेट्रो रेल कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे. ३३०८ वर्ग मीटर क्षेत्रात मेट्रो मॉलचे काम सुरू झाले. परंतु याची गती अतिशय संथ असल्याने मनपाने हे काम परत घेतले. स्वत:च्या स्तरावर मेट्रो मॉल विकसित करण्याच्या प्रस्तावाला मागच्या स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका