शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

नववर्षाच्या स्वागतासाठी सजतेय संत्रानगरी; बॉयफ्रेन्ड जीन्सची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:23 IST

२०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अ‍ॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे.

ठळक मुद्देहॉटेलमध्ये जेवण, मॉकटेल व डान्स पॅकेज

ऑनलाईन लोकमत

नागपूर : २०१७ संपायला आता काही दिवस शिल्लक असून २०१८ च्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. निदान सोशल मीडियावर फिरणाऱ्या ‘अ‍ॅडव्हॉन्स’च्या संदेशांनी याची चाहूल लागली आहे. स्वागत संदेश, अ‍ॅनिमेशन, जोक्स आणि डिजिटल ग्रिटींग कार्ड व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर पाठविण्याचे सत्र सुरू झाले असून अस्ताच्या वर्षातील आठवणी शेअर करून सरत्या वर्षाला ‘अलविदा’ करण्याची भावना या संदेशातून व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठांमध्ये याबाबत उत्साह कमी असला तरी कारण शोधणाऱ्या तरुण वर्गाला पार्टी करण्याची संधी मिळणार असल्याने त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. तरुणाईचा माहौल बघता हॉटेल, मॉल, सिनेमागृह आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांनी तयारी सुरू केली आहे.

शोरूममध्ये नवीन वर्षाची आॅफरशोरूम, मॉल आदी व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये नववर्षाची खरेदी लक्षात घेता तयारी केली आहे. कपडे आणि इतर वस्तूंचे नवनवीन कलेक्शन उपलब्ध केले आहेत. एका शोरूमचे अधिकारी करणसिंह छत्रे यांनी सांगितले, तरुणाईची पसंती लक्षात घेता ब्रॅन्डेड उत्पादन आणि नवीन फॅशनचे वस्त्र आणण्यात आले आहेत. ३० ते ५० टक्के सूट देण्याचा दावा करीत तरुणांना आकर्षित केले जात आहे. सॅन्डर्ल्स, हाय हिल्स, शूज आदींची ब्रॅन्डेड शृंखला शोरूममध्ये ठेवण्यात आली आहे. ई-वॅलेट पेमेंट करणाऱ्यांना डिस्काऊंटची सुविधा दिली जात आहे.आॅफ शोल्डर आणि मॅक्सी गाऊनला मागणी३१ च्या पार्टीला जायचे आहे, मग नवीन ड्रेस तर असायलाच हवा. त्यामुळे आतापासूनच नवीन ड्रेस खरेदी करण्याला सुरुवात झाली असून पुढचे दोन दिवस खरेदी सत्र चालणार आहे. तरुणीही नवीन ड्रेस खरेदीत व्यस्त असून आॅफ शोल्डर टॉप पॅटर्न, क्रॉप टॉप पॅटर्न, स्लिट ड्रेसेस, मॅक्सी गाऊन आणि बॉयफ्रेन्ड जीन्सला पसंती दिली जात आहे. मुलांमध्ये जीन्स आणि नवनवीन प्रकारच्या जॅकेट्सला पसंती मिळत आहे. तरुणी ड्रेसला अनुसरून नेलपेंट, लिपस्टीक आदींचा शोध घेत आहेत.हॉटेलमध्ये जेवण, मॉकटेल व डान्स पॅकेजतरुण वर्ग नववर्ष स्वागताची जशी उत्साहात वाट पाहत आहेत तसे हॉटेल व्यावसायिकही दरवर्षीप्रमाणे यंदाही या संधीची वाट पाहत आहेत. काही हॉटेल्समध्ये ओपन तर काहींमध्ये केवळ कपल्ससाठी पार्टीची तयारी केली आहे. एका हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार अडीच हजाराच्या पॅकेजमध्ये जेवणासह पार्टी, डान्स तसेच मॉकटेलची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. काहींनी आॅर्केस्ट्राची व्यवस्था केली असून डान्स करणाऱ्यांना आधीच त्यांच्या पसंतीच्या गाण्यांची यादी द्यावी लागणार आहे. हॉटेलमध्ये मद्यधुंद झालेल्यांकडून व्यवस्था बिघडू नये म्हणून मोठ्या संख्येने बाऊन्सर्स तैनात केले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पार्टी हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

पार्टीसाठी योग्य जागेचा शोधनवीन वर्षाचा सर्वाधिक उत्साह तरुणांमध्येच असतो. अनेकांनी तर आतापासूनच नववर्षात धूम करण्याचा मनसुबा मनात बाळगला आहे. त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे पार्टीची मोठी संधी आहे. मात्र नागपुरात पार्टीसाठी जावे कुठे हा संभ्रम त्यांच्या मनात आहे. पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी अभिनव कुळमेथेने सांगितले, वर्षात कधी पार्टी करण्याची वेळ आली तर लॉन, हॉटेल, किंवा रेस्टॉरंटची व्यवस्था केली जाते. मात्र ३१ डिसेंबरला प्रत्येक हॉटेल, क्लब बुक असतात. सर्वत्र गर्दी राहत असल्याने न्यू इयर पार्टीचा मनसोक्त आनंद घेता येत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या शहरात योग्य जागा शोधावी कुठे हा प्रश्न आहे. त्यामुळे शहराबाहेर फार्म हाऊसमध्ये जाण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले. सर्व मित्रांच्या संमतीने अधिक पैसे गोळा झाले तर पुणे किंवा गोव्याला जाणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. सध्या फुटाळा चौपाटी, किंवा इतर हॉटेललाच प्राधान्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

टॅग्स :New Year 2018नववर्ष २०१८