शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

मनपातील सत्तासमीकरण अपक्षांच्या मतावर

By admin | Updated: June 12, 2016 02:36 IST

राज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार सदस्यीय प्रभागाची व्यूहरचना : कमी टक्केवारीत मिळाली भाजपला सत्तागणेश हूड नागपूरराज्य सरकारने महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा भाजपला अधिक लाभ होईल, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु नागपूर महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीत अपक्षांना साडेतीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार असल्याने या मतांच्या कौलावर महापालिकेतील सत्तासमीकरण ठरणार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत अपक्ष व छोट्या पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक अवघड जाईल असा अंदाज आहे. एक ा प्रभागात ६० ते ७० हजार मतदार असल्याने ही एक मिनी विधानसभा निवडणूकच ठरणार आहे. या निवडणुकीचा खर्च प्रचंड वाढणार आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची इच्छा असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारेच ही निवडणूक लढू शकतील. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षाच्या उमेदवारांची संख्या मोजकीच राहणार आहे. पक्षाची परंपरागत मते फारसी बदलत नसतात. त्यामुळे गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता भाजपला काँग्रेसपेक्षा ९७७३८ मते अधिक मिळाली होती. भाजप-शिवसेना युतीचा विचार केला तर दोन्ही पक्षांना ६७८९१४ तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६०८३६० मते मिळाली होती. युती व आघाडीच्या मतातील अंतर केवळ ७०५५४ इतके आहे. त्यामुळे अपक्ष व लहान पक्षांना मिळालेल्या मतांचा कौल या निवडणुकीत कुणाच्या बाजूने जातो, यावर सत्तासमीकरण ठरण्याची शक्यता आहे. २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक झाली होती. यात २०,६७,८०९ मते वैध ठरली होती. ७२ प्रभागातून १४५ उमेदवार निवडून आले होते. यात भाजपला ६,१३,७४९ मते पडली. त्यांचे ६२ उमेदवार निवडून आले होते. भाजपला ३२ टक्के मते मिळाली असतानाही अपक्षांच्या पदतीने नागपूर महापालिकेतील सत्ता काबीज केली होती. या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मतांच्या तुलनेत निम्मेहून अधिक ३,६५,८३९ मते मिळूनही केवळ १० अपक्ष निवडून आले होते.एकूण मताचा विचार करता २०,६७,८०९ मतापैकी १४,५३,७७० मते इतर पक्षांना मिळाली होती. यात काँग्रेसला ५१६०३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९२३२९, बसपाला २०३५९७, शिवसेना ६५१७५, मनसे ४७९४४, भाकप २३२०, माकप ३०४, समाजवादी पार्टी ६९२०,जनता दल युनायटेड ५६०७ इतर राज्यस्तरीय पक्षांना १७५३५, आघाडीच्या उमेदवारांना १३४२१६ मते मिळाली होती. एकूण मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता अगामी निवडणूक कुणालाही सोपी नसल्याचे चित्र आहे. विकास योजनांवर भरकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या विविध योजना व शहरात हाती घेण्यात आलेल्या विकास कामांचा प्रचार करण्यावर भाजपचा भर राहील. परंतु या योजनांचा सर्वसामान्यांना थेट लाभ मिळत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीवर याचा प्रभाव कितपत राहील, हा प्रश्नच आहे. नकारात्मक वातावरणाचा फटकाकेंद्र व राज्य सरकाराच्या धोरणामुळे बाजारपेठेवर झालेला परिणाम यामुळे भाजपला साथ देणाऱ्या व्यापारी वर्गात असलेली नाराजी, तसेच सत्ताधारी पक्षाविषयी सर्वसामान्यांत नकारात्मक भावना निर्माण होते. महापालिकेत गेल्या काही वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. त्यातच मालमत्ता व पाणीकरातील दरवाढीचा फटका बसण्यची शक्यता नाकारता येत नाही.