शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महापौरांच्या खुर्चीवर बॅनर धरून विरोधकांची नारेबाजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 23:04 IST

महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हा अनैतिक भ्रष्टाचार केला असल्याने महापौरांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बुधवारी महापौर कक्षातील महापौरांच्या खुर्चीवर व्यंगचित्र काढलेले बॅनर धरून जोरदार नारेबाजी केली.

ठळक मुद्देराजीनाम्याची मागणी : महापौरांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर नंदा जिचकार यांनी सॅनफ्रॅन्सिस्को दौऱ्यात त्यांचा मुलगा प्रियांशला त्यांनी खासगी सचिव म्हणून सोबत नेले आहे. यासाठी त्यांनी महापालिकेला खोटी माहिती देऊन चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची तसेच अमेरिकेची फसवणूक केली आहे. नैतिकतेचा पाठ शिकविणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी हा अनैतिक भ्रष्टाचार केला असल्याने महापौरांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी बुधवारी महापौर कक्षातील महापौरांच्या खुर्चीवर व्यंगचित्र काढलेले बॅनर धरून जोरदार नारेबाजी केली.अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथे हवामान व ऊर्जेच्या जागतिक बदलावर आधारित परिषद आयोजित करण्यात आली होती. यासाठी महापौरांना निमंत्रित करण्यात आले होते. महापौरांनी नियमानुसार महापालिका कार्यालयाच्या खासगी सचिवांना सोबत नेणे अपेक्षित होते. परंतु त्यांनी तसे न करता स्वत:च्या मुलाला खासगी सचिव दर्शवून सोबत नेले. यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तानाजी वनवे व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी केली. यावेळी महापौरांचे व्यंगचित्र असेलेले वेगवेगळे बॅनर्स झळकावण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी महापौरांच्या कक्षापुढे घोषणाबाजी केली. महापौरांनी राजीनामा न दिल्यास सभागृहात महापौरांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.महापौरांच्या निष्क्रियतेमुळे नगरसेवकांना अद्याप विकास कामांसाठी निधी प्राप्त झालेला नाही. शहरातील समस्या मार्गी लागलेली नाही. पदाचा गैरवापर केल्यामुळे महापौरांनी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. आंदोलनात नगरसेवक किशोर जिचकार, जुल्फेकार अहमद भुट्टो, दिनेश यादव, परसराम मानवटकर, मनोज गावंडे, हषंला साबळे, जिशान मुमताज इरफान अन्सारी, प्रणिता शहाणे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल राऊ त, धीरज पांडे, शहर युवक काँग्रेसचे घनश्याम मांगे, महिला प्रदेश महामंत्री कांता पराते, निजामुद्दीन अन्सारी, विजय बाभरे, चंदू वाकोडकर, चंद्रप्रकाश शहाणे, अजित सिंग, अमीर नूरी, तनवीर विद्रोही, राजू महाजन, रजनी राऊ त, अर्चना गेडाम, बेबी गडेकर, अर्चना कापसे, संगीता उपेकर, अर्चना सिडाम, समशाद बेगम, सुनीता जिचकार आदींचा समावेश होता.

टॅग्स :Nanda Jichakarनंदा जिचकारagitationआंदोलन