शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांच्या खासगीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:55 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते विविध चाचण्यांचे, लॉन्ड्री व आहाराचे होत असलेल्या खासगीकरणाला वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) विरोध केला आहे.

ठळक मुद्देइंटकने दिले निवेदन आंदोलन उभारण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्वच्छतेपासून ते विविध चाचण्यांचे, लॉन्ड्री व आहाराचे होत असलेल्या खासगीकरणाला वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने (इंटक) विरोध दर्शवित, खासगीकरणाचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना दिले.विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेतर्फे (इंटक) त्रिशरण सहारे म्हणाले, एकप्रकारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा विस्कळीत करण्याचा हा डाव आहे. यापूर्वीदेखील सरकारने हा प्रयत्न केला होता. परंतु, तंत्रज्ञ संघटनेतर्फे राज्यभरात प्रचंड विरोध झाला. यामुळे क्ष-किरण सेवांच्या खासगीकरणावर थांबा लागला. तोच प्रयत्न आता लॉण्ड्री, रक्ताची चाचणी, रुग्णांचे भोजन, रुग्णालयातील स्वच्छता, एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी व डायलिसीस सेंटरसाठी होत आहे. खासगीकरणामध्ये बीपीएलसाठी मोफत तसेच काहींना सवलतीच्या दरात या सेवा देण्यात येतीलही, मात्र खासगी कंपनीकडे या सेवा दिल्यानंतर या मोफत सेवांवर अंकुश येणार आहे. सामान्यांना निदानासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क मोजावे लागणार आहे. खासगीकरणानंतर गरिबांची कंपनीकडून लूट केली जाईल, असे संघटनेतर्फे निवेदनातून मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आले आहे, असेही सहारे म्हणाले.सहारे यांच्या नेतृत्वात निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात देवराज चव्हाण, भगवान बावणे, मेघा परांजपे, प्रमिला पाटील, आनंद मामीडवार, लौकिक घुगरे, विलास बलिंगवार, किशोर कुलकर्णी, गोविंद लेकुळे, सचिन जाधव, भोजराज राऊत, रामप्रसाद खुडे, सुरेश वराडे, देवानिस फ्रान्सिस, वासुदेव टेंभे, राजा बालवे, राकेश ठाकूर, सागर गोदडीया, महेश गौरे, नितीन भारसकळ, स्वप्नील सुरडकर, प्रफुल चंद्रिकापुरे, अशोक राऊत, रवी खुपसे, धर्मपाल मेश्राम, तुषार उमाळे, रितेश जाधव, संजय चन्ने, दीपक ग्रोमकर यांच्यासह ‘वर्ग क’ व ‘वर्ग ड’चे मोठ्या संख्येत कर्मचारी उपस्थित होते. खासगीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन उभारू असा, इशाराही सहारे यांनी दिला.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय