शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

विरोधकांना तोंड लपवायला जागा राहिलेली नाही : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 00:26 IST

:व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देमहालमध्ये गडकरींच्या विजयाचा आनंदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :व्यक्ती कितीही मोठी झाली तरी ती ज्या ठिकाणी वाढली, संस्कारित झाली तेथील ऋण कधीही विसरत नाही. सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रामनगर भागात राहत असले तरी विजयानंतर अगोदर महालातील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसराकडे गेले. खुद्द गडकरी व मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांतर्फे महालातच विजयसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरी यांनी मतांचा इतिहास रचल्याचे सांगत विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही, असे प्रतिपादन केले.महाल येथील गडकरींच्या निवासस्थानाजवळ झालेल्या झालेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबईचे अध्यक्ष आ.आशिष शेलार, नागपूरचे शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.कृष्णा खोपडे, आ.अनिल सोले, आ.मिलिंद माने, आ.विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, अ‍ॅड.सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूरमध्ये अनेकांनी जातीपातीचे राजकारण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीन गडकरी यांनी जातपात न मानता सर्वांचे काम केले. त्यामुळे सर्वांनी त्यांना मतदान केले. नागपूरच्या इतिहासात गडकरी यांच्याएवढी मतं कुणीही घेतली नाही. त्यामुळेच विरोधकांना आता तोंड लपवायला जागा राहिलेली नाही. मिळालेला विजय डोक्यात जाणार नाही, तो मनात साठवून ठेवू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.माझा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे. निवडणुकीत आपण प्रचाराची पातळी खाली जाऊ दिली नाही. विचाराचा सामना विचाराने करायचा असतो. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अहंकार वाढणार नाही याचे वचन मी देतो. असे गडकरी म्हणाले. आज दिल्लीला जात असताना हवामान खराब झाले. त्यामुळे विमान वर-खाली झाले व मीदेखील दीड-दोन फूट उसळलो. वाटलं, आता काय होणार ? मात्र जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते व हीच माझी ताकद आहे, असेदेखील गडकरी यांनी यावेळी सांगितले.ही राज्यातील शेवटची पाणीटंचाईआज महाराष्ट्रात दुष्काळ आहे व पाणीटंचाई जाणवते आहे. आम्ही राज्यभरात सिंचनाची कामे हाती घेतली आहे. यावर्षी असलेली पाण्याची टंचाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील शेवटची पाणीटंचाई असेल. पुढील वर्षी ती राहणार नाही. पाण्याचा प्रश्न आम्ही अग्रक्रमाने सोडवू, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री