शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा जवानांना शाळा देण्याला विरोध

By admin | Updated: July 21, 2015 03:53 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानांच्या निवासासाठी उंटखाना

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानांच्या निवासासाठी उंटखाना येथील महापालिके च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेजची इमारत उपलब्ध क रण्याच्या प्रस्ताव आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी उंटखान्यातील नागरिकांनी सोमवारी महाल येथील मनपा कार्यालयापुढे निदर्शने करून जोरदार नारेबाजी केली. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळा सुरू करण्यात आली. त्याच वर्षात दीक्षांत सभारंभासाठी आलेले अनुयायी या शाळेत वास्तव्यास होते. या शाळेसोबत लोकांचे भावनिक नाते आहे. दुसरीकडे या शाळेत ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेचा निकालही चांगला आहे. मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार सर्व बालकांना जवळच्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक आहे. असे असतानाही सीआयएसएफ जवानांच्या निवासासाठी ही शाळा उपलब्ध करण्याचा मनपा प्रशासनाचा विचार आहे. परंतु आम्हाला हा निर्णय मान्य नसल्याचे नगरसेविका सुजाता कोंबाडे व अ‍ॅड. रेखा बाराहाते यांनी सांगितले.सुरक्षा ताफ्यातील सीआयएसएफ जवानांच्या निवासाची व्यवस्था संघ मुख्यालयापासून जवळच्या भागात करावी लागणार आहे. त्यामुळे सुरू असलेली शाळा बंद करण्याऐवजी रेशीमबाग वा महाल परिसरात उपलब्ध असलेल्या जागेचा विचार करण्यात यावा, असे मत कोंबाडे यांनी व्यक्त केले.सभागृहाची मंजुरी मिळण्यापूर्वीच मनपाच्या मालमत्ता विभागाने शाळा इमारत भाड्याने देण्याला सहमती दिली आहे. या शाळेचा तळमजला व पहिला मजला अशी ४९२.६२ चौ.मी. इमारत उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. पाच वर्षांसाठी हा करार केला जाणार आहे.सीआयएसएफचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल यांनी यासंदर्भात मनपाला पत्र पाठविले आहे. त्यानुसार मनपा प्रशासन कामाला लागले आहे. एक वर्षाचे भाडे अनामत रक्कम म्हणून मनपाकडे जमा करावे. भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ, वीज व पाण्याचे बिल सीआयएसएफला भरावे लागेल, अशा शर्ती मनपाने घातल्या आहेत. आंदोलनात डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, विजय गायकवाड, देवीदास कामडे, किरण देवरे, अष्टदीप नगरारे, संजय मून, राजेश ढेंगरे, अरविंद महाडिक, बबलू कडवे, राजू टेंभेकर, कैलास पाटील, सुधा कामडे, बेबीताई मेंढे, संगीता खापर्डे, पुष्पा नगरारे, कुंदाताई ताकसांडे, समता कळमकर, गीता लुटे यांच्यासह उंटखान्यातील नागरिकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)विषय स्थगितसुरक्षा जवानांना निवासासाठी शाळा उपलब्ध करण्याचा विषय सभेच्या कामकाजात समाविष्ट करण्यात आला होता. परंतु स्थानिक नागरिकांचा व नगरसेवकांचा विरोध विचारात घेता, महापौर प्रवीण दटके यांनी हा विषय स्थगित ठेवला. पुढील सभेत यावर चर्चा होणार आहे.