शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष आमदारांच्या नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून ‘मोदी हाय हाय’ घोषणा देत हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:23 IST

आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागील तीन वर्षांत काय केले? याचा हिशेब द्या, अशी मागणी आणि ‘भाजप सरकार, हाय हाय’, ‘मोदी हाय हाय’, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात आंदोलन केले.

हेच का तुमचे अच्छे दिनआॅनलाईन लोकमतनागपूर : आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागील तीन वर्षांत काय केले? याचा हिशेब द्या, अशी मागणी आणि ‘भाजप सरकार, हाय हाय’, ‘मोदी हाय हाय’, अशा घोषणा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात आंदोलन केले.सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकत्र आले. तेथून विधानभवनापर्यंत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वात विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत हल्लाबोल मोर्चा काढला. ‘भाजप सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत आमदारांनी हल्लाबोल केल्याने विधानभवन परिसर दुमदुमला.आंदोलन करताना आमदारांच्या हातात ‘कवडीमोल भावाने गेले सोयाबीन, हेच का तुमचे ‘अच्छे दिन’, ‘हल्लाबोल हल्लाबोल’, ‘कर्जमाफीचा अर्ज भरून शेतकरी बेजार’,‘ फसवणूक करणारं, हे नव्हं माझं सरकार’, असे फलक होते. आमदारांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाºया सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डल्लामार प्रकरणे उघड करू’, असे वक्तव्य केले होते. याचा समाचार घेताना धनंजय मुंडे यांनी या भेकड नाकर्ते सरकारच्या धमक्यांना भीक घालत नाही. त्यांच्यात हिंमत असेल तर सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल करावे, असे आव्हान त्यांनी दिले.या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. सुनील केदार, आ. विजय वडेट्टीवार, आ. भाई जगताप, आ. स्वरुपसिंग नाईक, आ. शशीकांत शिंदे, आ. सुनील तटकरे, आ. प्रकाश गजभिये, रिपब्लिकन पक्ष आ. जोगेंद्र कवाडे, शेकापाचे आ. जयंत पाटील, आ. हेमंत टकले यांच्यासह ३० पेक्षा जास्त आमदार उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७