शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्या. हक यांचे मुख्यालय बदलण्याला विरोध  : 'एचसीबीए'चा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 22:16 IST

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून नागपूरवरून औरंगाबाद केले आहे. त्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरचे सदस्य व्यथित झाले आहेत.

ठळक मुद्देमुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलवून नागपूरवरून औरंगाबाद केले आहे. त्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरचे सदस्य व्यथित झाले आहेत. सदस्यांची भावना लक्षात घेता, संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी तातडीची आमसभा बोलावण्यात आली व सखोल चर्चेनंतर न्या. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाविरुद्ध सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. तसेच, यासंदर्भात मुख्य न्यायमूर्तींना निवेदन सादर करून या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचे निश्चित झाले.न्या. हक हे नागपूर बारचे सदस्य आहेत. त्यांनी नागपूर खंडपीठात यशस्वीपणे वकिली करून स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. त्यामुळे त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते पीडितांना न्याय देण्यासाठी प्रभावीपणे कार्य करीत आहेत. ते प्रामाणिक व कर्तव्याप्रति समर्पित न्यायमूर्ती आहेत. नवोदित वकील त्यांचा आदर्श पुढे ठेवून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. त्यामुळे न्या. हक यांचे मुख्यालय नागपूरच ठेवणे आवश्यक आहे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. या विषयावर तातडीची आमसभा व्हावी याकरिता माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे व अन्य काही सदस्यांनी सोमवारी संघटनेला निवेदन सादर केले होते. त्यानंतर संघटनेच्या कार्यकारिणीची सभा घेण्यात आली होती. त्यात आमसभा बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आमसभेत संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. गौरी वेंकटरमण, उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील, सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.‘डीबीए’चे समर्थनहायकोर्ट बार असोसिएशनच्या ठरावाला डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन(डीबीए)ने समर्थन जाहीर केले. ‘डीबीए’चे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, सचिव अ‍ॅड. नितीन देशमुख व अन्य पदाधिकारी आमसभेत उपस्थित होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर