शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर  मनपात  पाणीटंचाईवरून सत्तापक्षाला कोंडीत पकडण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:37 IST

महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही सुरू झालेली नाही. मंगळवारी सर्वसाधारण सभेत या मुद्यावरून विरोधकांना सत्तापक्षाची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसमधील गटबाजीमुळे विरोधक निष्प्रभ : नागरिकांच्या प्रश्नांना न्याय कसा मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यातच शहराच्या विविध भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. कन्हान नदीच्या पात्रातील पातळी कमी झाली आहे. यासोबतच शहरातील नळांना पाणी कमी दाबाने येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन व सत्तापक्षाने संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु अद्याप त्यावर कार्यवाही सुरू झालेली नाही. मंगळवारी सर्वसाधारण सभेत या मुद्यावरून विरोधकांना सत्तापक्षाची कोंडी करण्याची संधी मिळाली आहे. परंतु विरोधक सभागृहात कशी भूमिका घेतात, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.सर्व कामकाज बाजूला सारून स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विरोधक संभाव्य पाणीटंचाईच्या मुद्यावर चर्चेची मागणी करू शकतात. यावर चर्चा झाल्यास संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात महापालिकेने हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती मिळू शकते. परंतु काँग्रेस दोन गटात विभागली आहे. त्यामुळे टंचाईसोबतच अन्य महत्त्वाच्या मुद्यावर काँग्रेस संघटित होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसापूर्वी मोमीनपुरा भागातील महिला मध्यरात्री पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. या प्रभागात काँग्रेसचे नगरसेवक आहेत. परंतु पाणीटंचाईच्या मुद्यावर गप्प आहेत. दुसरीकडे उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या वाढत आहे.तसेच नगरसेवकांना निधी वाटप करताना भेदभाव केला जातो. महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात १२ टक्के कपात केली आहे. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा काँग्रेस नगरसेवकांचा आरोप आहे. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक नितीश ग्वालबन्शी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला आहे.अमृत योजनेवर होणार निर्णयकेंद्र सरकारच्या अटल मिशन फॉर रिजूनेशन आॅफ अर्बन ट्रान्समिशन(अमृत)अभियानांतर्गत महापालिकेला २८२.५९ कोटींचा निधी पाणीपुरवठा योजनांसाठी प्राप्त झाला आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून राबविण्याचे निर्देश मुंबई येथे आयोजित बैठकीत देण्यात आले होते. परंतु त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने ही केंद्र सरकारची योजना असल्याने महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात यावी, अशा स्वरूपाचे निर्देश दिले आहे. याबाबतचा विषय मंजुरीसाठी सभागृहात ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी