शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

परिचालकांना १० महिन्यांपासून मानधन नाही

By admin | Updated: August 26, 2015 03:10 IST

आॅनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्र्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाशी जोडण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद : आॅनलाईन यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता नागपूर : आॅनलाईन यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्र्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाशी जोडण्यात आल्या आहेत. यात महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांना मागील काही महिन्यांपासून मानधन नाही. काहींना १० महिन्यांपासून मानधन नसल्याने संघटनेच्या वतीने मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ई-पंचायत प्रकल्पाचे काम जि.प.तील संग्राम कक्षाद्वारे चालविले जाते. परंतु कंत्राटदाराकडून जिल्ह्यातील ७६५ संगणक परिचालकांना वेळेवर मानधन दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. कुही तालुक्यातील आठ परिचालकांना नोव्हेंबर २०१४ पासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तालुका समन्वयक यांच्याकडे मानधनासंदर्भात विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे कुही तालुका अध्यक्ष हरिदास सूरजवंसे यांनी दिली. ई-पंचायत प्रकल्पाचे काम खासगी कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले आहे. नियमानुसार परिचालकांना दरमहा ८,९०० रुपये मानधन मिळणे अपेक्षित आहे. परंतु त्यांना ४,५०० रुपये मानधन दिले जाते. परिचालकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. त्यातच शासनाकडून कंत्राटदार दर महिन्याला बिल उचलतो. परंतु परिचालकांना देत नाही, अशी व्यथा संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडली. यात सूरजवंसे यांच्यासह अरुणा गजभिये, राकेश चिमणकर, प्रशांत कुरुडकर, गोपाल चकोले, लक्ष्मण सहारे, मनोज गजभिये, नीलेश मानकर, राहुल सहारे, आशिष गोमकर, जितेश दोरखंडे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)