शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:29 IST

गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांची कल्पना : गुन्हेगारांवर जरब बसविण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी तसेच शहर पोलिसांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी एक धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ असे या उपक्रमाचे नाव असून, सोमवारी सकाळपासून या उपक्रमाची शहरातील ३० ही पोलीस ठाण्यात एकसाथ सुरुवात झाली आहे.२७ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर २०१८ असे सलग १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर ‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ चालविले जाणार आहे. त्यानुसार, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला रोज त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागणार आहे. ठाणेदाराने त्यांच्या सहकाऱ्यामार्फत किती गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, लुटमार, चेनस्नॅचिंग, वाहनचोरी, एटीएम, घरफोडी करणारे गुन्हेगार किती तपासले. त्यांच्याकडून किंवा दुसऱ्या नवीन गुन्हेगारांकडून किती शस्त्रे जप्त केली, त्यांच्यावर काय प्रतिबंधात्मक कारवाई केली, याचा अहवाल तयार करावा लागणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या कुठे राहत आहेत, ते काय करतात, त्याचीही माहिती रोजच्या रोज सर्व वरिष्ठांना सादर करावी लागणार आहे.ठाणेदारांनी केलेल्या कारवाईचा अहवाल डीसीपी, गुन्हे शाखेसह पोलीस नियंत्रण कक्षाला देणेही बंधनकारक आहे. ठाणेदारांनी तयार केलेल्या गुन्हेगार तपासणीच्या अहवालाची एसीपी, डीसीपींना त्यांच्या परिमंडळनिहाय शहानिशा करावी लागणार आहे.गुन्हेगारी नियंत्रणाची अपेक्षा‘आॅपरेशन क्रॅक डाऊन’ उपक्रमांतर्गत रोजच गुन्हेगार तपासले जातील. गुन्हेगारांवर पोलिसांकडून रोजच नजर ठेवली जाणार असल्यामुळे गुन्हेगारांवर जरब राहील. त्यांना उपद्रव करण्यास संधी मिळणार नाही. पोलिसांचा धाक वाढेल. अर्थात शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात यश येईल, अशी यामागे पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची कल्पना आहे.यापूर्वीचे सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी शहरातील गुन्हेगार त्यांच्या घरीच आहे की आणखी कुठे, ते शोधून काढण्यासाठी पोलिसांना रोज टास्क देणे सुरू केले होते. त्यानुसार, आज कोणता गुन्हेगार कुठे आहे, त्याची माहिती काढून त्याच्यासोबत सेल्फी काढायची आणि ती वरिष्ठांना पाठविण्याचे निर्देश प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलिसांना देण्यात आले होते. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते, हे विशेष!

टॅग्स :Crimeगुन्हाNagpur Policeनागपूर पोलीस