शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील तीन हजारावर नवीन वीज जोडण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:21 IST

महावितरण व एसएनडीएल कंपनीकडे प्रलंबित नवीन वीज जोडणीच्या तीन हजारावर अर्जांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मोकळा केला.

ठळक मुद्देहायकोर्ट : अर्जांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरण व एसएनडीएल कंपनीकडे प्रलंबित नवीन वीज जोडणीच्या तीन हजारावर अर्जांवर कायद्यानुसार निर्णय घेण्याचा मार्ग मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी मोकळा केला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने ५ एप्रिल २०१८ रोजीच्या आदेशाद्वारे भोगवटा किंवा बांधकाम पूर्णत्वाच्या प्रमाणपत्राची अट शिथिल केली होती. तसेच, हायटेन्शन लाईन अस्तित्वात नसलेल्या परिसरातील आणि हायटेन्शन लाईन अस्तित्वात असल्यास तिच्यापासून नियमानुसार अंतर सोडून कायद्यानुसार बांधण्यात आलेल्या नवीन घरांना, जुन्या घरांना, मंजूर आराखडा असलेल्या नवीन घरांना व गृह प्रकल्पांना, गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरणाधीन असलेल्या नवीन ले-आऊटस्मधील घरांना, महोत्सव, सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक मेळावे इत्यादीसाठी तात्पुरती वीज जोडणी मागणाऱ्यांना व मोकळ्या जमिनीवर अधिकृत बांधकाम करण्याचे हमीपत्र देऊन नियमित वीज जोडणी मागणाऱ्यांना वीज जोडणी देण्यात यावी, असे दिशानिर्देश दिले होते. याशिवाय अन्य प्रकरणांत वीज जोडणी द्यायची झाल्यास आवश्यक कारणे नमूद करण्यास सांगितले होते. त्यानंतर आतापर्यंत सादर व वरील प्रकरणांत मोडत नसलेल्या नवीन वीज जोडणीच्या तीन हजारावर अर्जांवर महावितरण व एसएनडीएल कंपनीने निर्णय घेतला नाही. दरम्यान, त्यांनी यासंदर्भात न्यायालयाकडूनच योग्य आदेश मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांचा अर्ज निकाली काढून वीज जोडणीच्या प्रलंबित अर्जांवर योग्य कारणांसह कायद्यानुसार निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा केला.दोन वर्षांपूर्वी प्रियांश व पीयूष धर ही जुळी मुले एका सदनिकेच्या गॅलरीत खेळताना हायटेन्शन लाईनच्या संपर्कात आली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. उच्च न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यानंतर शहरातील हायटेन्शन लाईन जवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविणे यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली. याशिवाय वेळोवेळी आवश्यक आदेश जारी करण्यात आले. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून इतर पक्षकारांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक, अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर आदींनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज