शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत साकारणार खुला रंगमंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:29 IST

उपराजधानीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम आयोजित करणे आजच्या तारखेत जागेअभावी कठीण गोष्ट आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची घोषणा : धनवटे रंग मंदिरालादेखील मिळणार नवसंजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत एखादा कार्यक्रम आयोजित करणे आजच्या तारखेत जागेअभावी कठीण गोष्ट आहे. अशा स्थितीत शहरात खुला रंगमंच (अ‍ॅम्फिथिएटर) असण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे.यासंदर्भात पुढाकार घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. नागपुरात १५-१६ हजार नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या सांस्कृतिककार्यक्रमाचे किंवा कलाकृतीचे आयोजन करायचे असेल तर तशी जागा उपलब्ध नाही. यशवंत स्टेडियम किंवा कस्तूरचंद पार्क येथे अशा प्रकारचे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. अशा स्थितीत शहरात मध्यवर्ती ठिकाणी सांस्कृतिक आयोजनासाठी हक्काचा खुला रंगमंच असणे आवश्यक आहे. यादृष्टीने पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मराठी नाटक देशात सर्वात समृद्धमहाराष्ट्राने सांस्कृतिक चळवलीला मौलिक योगदान दिले आहे. मराठी नाटक तर देशात सर्वात समृद्ध मानले जाते. कलाकारांनी वेगळी छाप पाडत आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र मुंबई, पुण्याकडे नाटकांची संख्या मोठी असताना नागपुरात जागा मिळत नाही, अशी कलाकारांची तक्रार रहायची. मात्र सुरेश भट सभागृहाने ही तक्रार दूर केली आहे. कुठल्याही महानगरपालिकेने इतके सुंदर व आकर्षक सभागृह बांधलेले नाही, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. गडकरी यांनी सभागृहाच्या निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराची मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रशंसा केली.