शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तडीपार गुन्हेगारांचे पोलिसांना खुले आव्हान

By योगेश पांडे | Updated: January 19, 2025 23:39 IST

दोन वर्षांत दीडशेहून अधिक प्रकरणे उघडकीस : मुदतपूर्व घरवापसी अन् परत गुन्हेगारीत सक्रिय  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून शहरातील गुन्हेगारीचा मुद्दा हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर तडीपारीची कारवाई केली जाते व शहर किंवा जिल्ह्याबाहेर रवानगी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात बरेचसे गुन्हेगार केवळ पंधरा दिवसांच्या आतच शहरात परतून परत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होतात. आश्चर्याची बाब म्हणजे, पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला अनेकदा याची लवकर कल्पनादेखील येत नाही. मागील दोन वर्षांत अशी दीडशेहून अधिक प्रकरणे उघडकीस आली असून हे तडीपार गुन्हेगार पोलिसांनाच खुले आव्हान देत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांकडून तडीपारीची कारवाई केली जाते. शहर व जिल्ह्यात शांतता राहावी म्हणून उपद्रवी लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते, तर अट्टल गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले जाते. गुन्हे शाखेकडून वेळच्या वेळी सर्व गुंड, गुन्हेगारांची कुंडली काढली जाते. ज्यांच्यावर गंभीर व अधिक गुन्हे आहेत, अशांवर तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिस उपायुक्तांकडे पाठविण्यात येतो. मागील दोन वर्षांत शेकडो गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई झाली. मात्र, प्रत्यक्षात तडीपारीची कारवाई बरेचसे गुन्हेगार गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. तडीपारीचा आदेश निष्प्रभ ठरत असल्याचे अनेक प्रकरणांत उघड झाले आहे.

ठरावीक मुदतीपर्यंत नागपुरात परतायचे नाही, अशी ताकीद देऊन तडीपार केलेल्या गुन्हेगाराला पोलिस बाहेरगावी नेऊन सोडतात; परंतु तो गुन्हेगार लगेच आपल्या शहरात परततो अन् गुन्हेगारीला लागतो. यातील काहीजणांना पोलिसांकडून परत अटक करण्यात आली. दोन वर्षांत असे दीडशे आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. हा आकडा बराच मोठा असून यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

२०२४ मध्ये ७२ तडीपारांवर कारवाईसर्वसाधारणत: गुन्हेगारांना सहा महिने, वर्ष किंवा दोन वर्षांसाठी शहर अथवा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येते. मात्र, तेवढ्या कालावधीसाठी शहराबाहेर न राहता आरोपी काही दिवसांतच परततात. काहीजण उघडपणे घरीच राहतात, तर अनेकजण दुसऱ्या ठिकाणी आसरा शोधतात. पोलिसांच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये ७८ तडीपार कारवाई झाल्यावर शहरात फिरताना आढळले होते, तर २०२४ मध्ये हा आकडा ७२ इतका होता. आश्चर्याची बाब म्हणजे, यात काही महिलांचादेखील समावेश होता.

२०२५ मध्ये आढळले नऊ तडीपारवर्षाच्या पहिल्याच महिन्यात अनेक गुन्हेगार तडीपारीची कारवाई झाली असतानादेखील शहरात परतले आहेत. यातील नऊजणांवर २० दिवसांत कारवाई झाली आहे. मात्र, इतरांवर कठोर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. बऱ्याच तडीपारांच्या मुदतीपूर्वीच्या घरवापसीची पोलिसांना कल्पना असते. मात्र, त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करण्यात येते. काही गंभीर गुन्ह्यांत असे तडीपार मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहेत.

शहरात आढळलेले तडीपार वर्ष : मुदतपूर्व परतलेले आरोपी२०२३ : ७८२०२४ : ७२२०२५ : ९

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी