शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओपीडी घटली, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 21:19 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आढावा आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यांच्यानुसार मार्च व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काहीसा परिणाम झाला, परंतु आता सुरळीत होत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून आढावा : लसीकरण कार्यक्रमाला आली गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आढावा आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यांच्यानुसार मार्च व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला काहीसा परिणाम झाला, परंतु आता सुरळीत होत आहे.सर्वच शासकीय रुग्णालयांमधून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम, सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, साथरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अशा विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतून आजारांचे निदान व उपचार केले जातात. या कार्यक्रमात दरवर्षी जिल्ह्यांना लक्ष्य दिले जाते. परंतु मार्चपासून कोरोनाचा उद्रेक सुरू झाला. ‘लॉकडाऊन’मुळे नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. यातच ग्रामीण व मनपाच्या डॉक्टरांसह, परिचारिका व कर्मचाऱ्यांची क्वारंटाईन सेंटर, चेक पोस्ट, कोविड सेंटर येथे ड्यूटी लावण्यात आली. यामुळे ज्यांच्याकडे जे कार्यक्रम होते, त्यावर परिणाम झाला आहे. यातच लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे ओपीडीत रुग्णसंख्येत घट झाल्याचाही प्रभाव राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर पडला. या सर्वांचा आढावा घेण्याच्या सूचना संचालकांनी दिल्या होत्या. त्यानुसार, आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन सध्याच्या स्थितीची माहिती घेतली आहे.सुरुवातीला प्रभाव पडला, परंतु आता सुरळीत होत आहेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यांनी सांगितले, लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीमुळे ओपीडीत रुग्णांची घट झाली आहे. यामुळे मार्च महिन्यात व एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला काहीसा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर पडला. परंतु आता सर्व कार्यक्रम सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे. विशेषत: लसीकरण, जोखमीच्या मातांना मदत या कार्यक्रमांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कुष्ठरोग व क्षयरोगाच्या रुग्णांना घरी जाऊन औषधांचे वाटप केले जात आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य