शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

-तरच नागपुरात १४ दिवसांचा ‘स्मार्ट लॉकडाऊन’ : पालकमंत्री राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:17 IST

जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊन लावला जाईल, परंतु तो १४ दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन असेल.

ठळक मुद्दे सर्व बाबींचा विचार करून समिती घेणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूनंतर लवकरच कठोर लॉकडाऊन लागण्याची शहरात चर्चा आहे. दरम्यान, पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची आज घोषणा केली. ते म्हणाले, सर्व बाबींचा विचार केल्यानंतर लॉकडाऊन लावण्याची खरेच गरज पडली तरच लॉकडाऊन लावला जाईल, परंतु तो १४ दिवसांचा स्मार्ट लॉकडाऊन असेल.राऊत यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत्यूदर कमी ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच पालकमंत्र्यांचीही आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक व सामाजिकदृष्ट्या लोक तुटतात व आत्महत्या करतात. आर्थिक व्यवहारही कमी होतो. त्यामुळेच लॉकडाऊन लावण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करायला हवा. त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. यात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक हे वरिष्ठ अधिकारी असतील. ही समिती परिस्थिती पाहून लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय घेईल. तसेही केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार ग्रामीणची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि शहराची जबाबदारी ही मनपा आयुक्तांकडे आहे. पालकमंत्र्यांसह इतर लोकप्रतिनिधी केवळ मार्गदर्शन करू शकतात. लॉकडाऊनबाबत पत्रपरिषदेत संभ्रमही दिसून आला. एकीकडे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला तर दुसरीकडे लॉकडाऊनबाबतही इशारा देण्यात आला.राऊत यांनी हे स्पष्ट केले की, खूपच गरज पडली तरच लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला जाईल. परंतु तो स्मार्ट लॉकडाऊन असेल आणि कमीत कमी १४ दिवसाचा कर्फ्यूसह राहील. या दरम्यान उद्योग, कार्यालयात कामे कशी सुरू राहावीत, या काळात कुणीही उपाशीपोटी मरू नये, आर्थिक संकटात येऊ नये, याची खबरदारी घेण्यात येईल. यादरम्यान नागरिकांना दिलासा मिळावा याचा प्रयत्न केला जाईल. मधुमेह रुग्ण, गर्भवती महिला, हृदयरोगी यांना घरातच एकांतवासात राहावे लागेल. कॅशलेश देवाण-घेवाणीला प्रोत्साहन दिले जाईल.प्रत्येक वस्तीत कोरोना दक्षता समितीपालकमंत्र्यांनी सांगितले की, नागरिकांना कोविड-१९ बाबत जागरूक करण्यासाठी प्रत्येक वस्तीमध्ये कोरोना दक्षता समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कोरोना संसर्ग काळात नागरिकांना कसे राहावे, याबाबत मार्गदर्शन करेल. तसेच प्रत्येक वॉर्डात अ‍ॅण्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ती नि:शुल्क राहील. तर खासगी रुग्णालये व क्लिनिकमध्ये अ‍ॅण्टिजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात येईल. यासाठी ७०० रुपयांचे शुल्क घेण्यात येईल. सरकारी व मनपा रुग्णालयातही ही सुविधा नि:शुल्क राहील.प्रशासनाचा बचावमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर होत असलेल्या आरोपादरम्यान पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासनासह पोलीस विभागाच्या कामाची प्रशंसा केली. या अधिकाऱ्यांमुळेच नागपुरात कोरोना नियंत्रणात आहे. आज डॉक्टरांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सारेच थकले आहेत. परंतु अजूनही ते निकराने लढा देत आहेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणातविभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण २८४८ पॉझिटिव्ह लोकांपैकी केवळ ८१५ अ‍ॅक्टिव्ह आहेत. ग्रामीणमधील १०३५ रुग्णांपैकी केवळ ६३४ अ‍ॅक्टिव्ह आहेत. व्हेंटिलेटर व बेड पुरेसे आहेत. त्यामुळेच संस्थागत क्वारंटाईन बंद करून होम क्वारंटाईन सुरू करण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये मृत्यूदर १.३ व शहरात १.५ आहे. देशात तो सर्वात कमी आहे. दररोज २२०० टेस्ट करण्याची सुविधा विकसित करण्यात आली आहे. १०,८०३ अ‍ॅण्टिजेन टेस्ट झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याguardian ministerपालक मंत्रीNitin Rautनितीन राऊत