शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ सात टक्के फौजदारी प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: June 26, 2017 01:41 IST

राज्यातील न्यायालयांमध्ये फौजदारी प्रकरणांचा निपटारा केवळ सात टक्के आहे. दररोज नवनवीन प्रकरणे दाखल होत आहेत.

न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये होत आहे वाढ राहुल अवसरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील न्यायालयांमध्ये फौजदारी प्रकरणांचा निपटारा केवळ सात टक्के आहे. दररोज नवनवीन प्रकरणे दाखल होत आहेत. त्यामानाने प्रकरणे प्रलंबित होण्याचे प्रमाण सतत वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार २०१२ मध्ये न्यायालयांमध्ये १४ लाख ८० हजार ८८४ प्रकरणे सुनावणीस होती. त्यापैकी १ लाख २९ हजार १०९ प्रकरणांचा निपटारा होऊन १३ लाख ५१ हजार ७७५ प्रकरणे प्रलंबित राहिली. ८.७ टक्के प्रकरणांचा निपटारा होऊन ९१.३ टक्के प्रकरणे प्रलंबित राहिली. २०१३ मध्ये १५ लाख ३ हजार ४८६ प्रकरणांपैकी १ लाख ३४ हजार १९२ प्रकरणे निकाली निघून १३ लाख ६९ हजार २९४ प्रकरणे प्रलंबित राहिली. प्रकरणांच्या प्रलंबनाची ही टक्केवारी ९१.१ आणि प्रकरणे निकाली निघाल्याची टक्केवारी ८.९ होती. २०१४ मध्ये १५ लाख ३१ हजार ९६६ प्रकरणांपैकी १ लाख २० हजार ४७४ प्रकरणे निकाली निघून १४ लाख ११ हजार ४९२ प्रकरणे प्रलंबित राहिली. प्रकरणांचा निपटारा होण्याचे प्रमाण ७.९ आणि प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण ९२.१ टक्के होते. खटले प्रलंबनात नागपूर दुसरे वाढत्या गुन्हेगारीच्या मानाने न्यायालयांकडून खटला चालविण्याचे प्रमाण वाढलेले नाही. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आणि न्यायालयांनी खटले निकाली काढण्याचे गुणोत्तर २:१ असे आहे. ही तफावत कमी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. २०१५ मध्ये राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सुनावणीसाठी आलेल्या प्रलंबित खटल्याची सरासरी टक्केवारी ९२.१६ एवढी होती. त्यापैकी सर्वाधिक ९७.०५ टक्के प्रलंबित प्रकरणे पुणे, त्याखालोखाल ९७.०४ टक्के नागपूर, ९६.०९ टक्के नवी मुंबई, ९६.७८ टक्के प्रकरणे ठाणे आणि ९६.४ टक्के प्रकरणे सोलापूर न्यायालयात आहेत.