शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

गुंतवणूक कमी केल्यानंतरच कागद उद्योगाला येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: January 10, 2016 03:38 IST

कागद उद्योग संकटात आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासह

नितीन गडकरी यांचे प्रतिपादन : पेपर ट्रेडर्स असोसिएशनची बैठकनागपूर : कागद उद्योग संकटात आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी उद्योजक आणि व्यापाऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासह गुणवत्तेत सुधारणा आणि विजेचा खर्च कमी करावा लागेल. या गोष्टी ध्यानात ठेवून उत्पादन केल्यास कागद उद्योगाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. फेडरेशन आॅफ पेपर ट्रेडर्स असोसिएशन आॅफ इंडियाच्या (एफपीटीए) नागपूर शाखेतर्फे आयोजित व्यवस्थापकीय समितीची दुसरी बैठक वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये शनिवारी पार पडली. मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. ‘एफपीआयए’चे अध्यक्ष सी. बालासुब्रमणियन अध्यक्षस्थानी होते. विशेष अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, सेंच्युरी पल्प अ‍ॅण्ड पेपरचे मुख्य विक्री अधिकारी डॉ. अलोक प्रकाश आणि कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅटचे) राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, पूनमचंद मालू होते. यावेळी स्मरणिका आणि एफपीटीएच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. आयातीत कागदाची कमी किंमतगडकरी म्हणाले, आयातीत कागदाची किंमत उत्पादन किमतीपेक्षा कमी आहे. सरकार खुल्या जागेवर उद्योजकांना झाडे लावण्याची परवानगी देण्याच्या विचारात आहे. त्याचा उपयोग कागद उद्योगांना होणार आहे. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारतात पाण्याच्या माध्यमातून केवळ ३.५ टक्के उत्पादनांची वाहतूक केली जाते. हे प्रमाण अन्य देशात ३० टक्के आहे. या माध्यमातून वाहतूक वाढविण्याला सरकार प्रोत्साहन देत आहे. पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या कागदाच्या उत्पादनासाठी उद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग आणि पर्यावरणाच्या हितार्थ टाकाऊ कागदाचा योग्यपणे निपटारा करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. प्रवीण दटके यांनी नागपुरातील कागद उद्योग आणि प्रिटिंगचा इतिहास सांगितला. हा व्यवसाय हळूहळू कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली ‘एफपीटीए’चे अध्यक्ष सी. बालासुब्रमणियन यांनी असोसिएशनची स्थापना आणि महत्त्व सांगितले. विदेशाच्या तुलनेत कागद उद्योग उत्तम असल्याचे म्हणाले. बी. सी. भरतीया म्हणाले, उद्योजकांच्या हितासाठी सरकारने अनेक कायदे तयार केले असून त्याची माहिती नाही. कायद्याची माहिती करून घ्यावी. डॉ. आलोक प्रकाश म्हणाले, उद्योजकांनी उत्पादन आणि गुणवत्तेसह सेवेवर विशेष लक्ष द्यावे. बाजारपेठांच्या मागणीनुसार व्यवसाय टिकून राहतो, यावर त्यांनी सोदाहरण माहिती दिली. मूल्यवर्धित सेवेची गरज असल्याचे सांगितले. ‘एफपीटीए’चे माजी अध्यक्ष महेश खंडेलवाल यांनी नागपुरात या उद्योगाच्या वाढीची शक्यता व्यक्त केली. नागपुरात अनेक महत्त्वपूर्ण कंपन्या आणि संस्था सुरू होत आहेत. अशा स्थितीत या उद्योगाचे भविष्य उज्ज्वल आहे. (प्रतिनिधी)असोसिएशनचे पदाधिकारीयावेळी पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष सुशील अग्रवाल, सचिव पीयूष फत्तेपुरीया, उपाध्यक्ष आल्हाद शास्त्री, कोषाध्यक्ष संजय कौशिक, सहसचिव राम खुबचंदानी, माजी अध्यक्ष मनोज बिर्ला, व्यवस्थापकीय समिती सदस्य विजय खंडेलवाल, असीम बोरडिया, राजेश आर. खंडेलवाल, गिरीश झुनझुनवाला, ललित सूद, अमर ग्यानचंदानी, आशिष पी. खंडेलवाल, विमल केयाल, नीरज खंडेलवाल, ओमप्रकाश मुद्रा, सतीश आहुजा, असीम बोरडिया, सुधीर जैन, सुनील गोयंका, जयप्रकाश अग्रवाल, निर्मल कोहाळ आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.