शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  ५०० रुपयाच्या वादात महिलेवर खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:33 IST

केवळ ५०० रुपयाच्या वादात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून महिलेसह तिघांना जखमी करण्यात आले. मंगळवारी रात्री हुडकेश्वर ठाणे परिसरातील म्हाळगीनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे मध्यस्थी करणारेही जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केवळ ५०० रुपयाच्या वादात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करून महिलेसह तिघांना जखमी करण्यात आले. मंगळवारी रात्री हुडकेश्वर ठाणे परिसरातील म्हाळगीनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी आरोपी बाळकृष्ण सरदार बोरकर (४७) रा. न्यू नेहरूनगर याला अटक केली आहे.बोरकर सेंट्रिंगचे काम करतो. त्याची सुनीता ढोले (३८) यांच्याशी जुनी ओळख आहे. सुनीता कॅटरिंगचे काम करते. तिने काही दिवसांपूर्वी बोरकरकडून १० हजार रुपये उधार घेतले होते. सुनीताने ते पैसे बोरकरला परतही केले. परंतु बोरकर आणखी ५०० रुपये शिल्लक असल्याचे म्हणत होता. यावरून त्या दोघांमध्ये वाद सुरू होता. मंगळवारी रात्री ७ वाजता बोरकरने सुनीताला चर्चेसाठी म्हाळगीनगरातील एनआयटी गार्डनमध्ये बोलावले. तिथे तो सुनीताला ५०० रुपये मागू लागला. परंतु तिने नकार देताच त्याला राग आला. सुनीताने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी बोरकरने चाकू काढला आणि महिलेवर वार केले. यात गंभीर जखमी झालेली सुनीता ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आावाज ऐकून गार्डनमध्ये फिरत असलेले लोक आले. त्यांनी बोरकरला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने लोकांवरही हल्ला केला. यात दोन युवकही जखमी झाले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. सुनीताला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना कळविण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न व हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :WomenमहिलाCrimeगुन्हा