शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ४० टक्केच औषध साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 10:08 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला लागलेल्या आगीच्या घटनेने औषध बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देऔषध बाजार बंदचा फटकारुग्ण अडचणीत येणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंजीपेठ येथील विदर्भातील सर्वात मोठ्या औषध बाजाराला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीच्या घटनेने ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तब्बल तीन दिवस बाजार बंद राहिल्याने औषधी दुकानांमध्ये ४० टक्केच औषधांचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारपासून बाजार पूर्ववत न झाल्यास रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.शहरच नाही तर संपूर्ण विदर्भाला औषधांचा पुरवठा करणारे नागपुरात ३०० हून अधिक ठोक विक्रेते आहेत. गांधीबाग येथे १५० तर संदेश औषध बाजारातही एवढीच दुकाने आहेत. गुरुवारी रात्री संदेश औषध बाजाराला लागलेल्या भीषण आगीत बहुसंख्य दुकानांना झळ पोहोचली. सुमारे दीडशे कोटींची औषधे आगीत नष्ट झाल्याचे बोलले जाते. या घटनेवर ‘नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन’ने शुक्रवारपासून संदेशसोबतच गांधीबाग औषध बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या ठोक विक्रेत्यांकडूनच किरकोळ औषधी दुकानांना सामान्यसोबतच महागडी औषधे वेळेवर उपलब्ध होत होती. परंतु तीन दिवस संदेश बाजार बंद असल्याने याचा फटका या दुकानांसोबतच रुग्णांना बसत आहे. धंतोली, रामदासपेठ व वर्धा रोडवरील औषध दुकानदाराने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. संपूर्ण शहराला संदेश बाजारामधून ७५ टक्क्यांवर औषधांचा पुरवठा व्हायचा. हा बाजारच बंद पडल्याने दुकानात केवळ ४० टक्के व त्यापेक्षाही औषधांचा साठा कमी उरलेला आहे. विशेषत: जी दुकाने चार-पाच स्ट्रीप्ससाठी या बाजाराला फोन करून आॅर्डर द्यायचे, ते अडचणीत आले आहेत. सोमवारपासून हा औषधांचा बाजार सुरू न झाल्यास परिस्थिती कठीण होईल, असेही ते म्हणाले.

रविवारी वाढली रुग्णांची धावाधावरविवारी शहरातील अनेक औषधांची दुकाने बंद असतात. वर्धा रोड, धंतोली व इतर काही ठिकाणी मोजकीच दुकाने सुरू राहतात. यातच तीन दिवसांपासून औषध बाजार बंद असल्याने एकाच दुकानात सर्वच प्रकारच्या औषधी मिळणे कठीण झाले होते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांवर धावाधाव करण्याची वेळ आली होती.

काही दुकाने सुरू करण्याचा प्रयत्नसंदेश औषधांचा बाजारातील ज्या दुकानांना आगीची झळ पोहचली नाही, ती सोमवारपासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. विजेसाठी जनरेटरची व्यवस्था केली जाणार आहे. अग्निशमन विभागाची मंजुरी मिळाल्यावरच दुकाने सुरू करता येणार आहे. मात्र,सोमवारीच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. औषधांचा तुटवडा पडणार नाही, यासाठी असोसिएशन पूर्ण प्रयत्न करीत आहे.- राजेंद्र कावलकर, अध्यक्ष, नागपूर डिस्ट्रीक्ट केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन

टॅग्स :medicineऔषधं