शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

१३ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत; नागपूर विद्यापीठातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 11:34 IST

Nagpur News नागपूर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण महाविद्यालयांपैकी केवळ १३ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत आहेत.

ठळक मुद्दे सुविधा व दर्जाच्या अभावामुळे महाविद्यालयांकडून पुढाकार नाही

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पाचशेहून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र ‘लोकमत’च्या हाती आलेली माहिती यावर शिक्कामोर्तब करणारीच आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण महाविद्यालयांपैकी केवळ १३ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत आहेत. त्यातही ‘अ प्लस’ श्रेणीतील महाविद्यालयांची संख्या ही अवघी बोटांवर मोजण्याएवढीच आहे. पायाभूत सुविधा, शिक्षक व दर्जाच्या अभावामुळेच महाविद्यालयांकडून ‘नॅक’च्या मूल्यांकनासाठी पुढाकार घेण्यात येत नसल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.

सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात ५०३ महाविद्यालये आहेत. यापैकी साडेतीनशेहून अधिक महाविद्यालये ही १० वर्षांहून अधिक जुनी आहे. १० वर्षे पूर्ण झालेल्यांपैकी अवघ्या ६८ महाविद्यालयांचे ‘नॅक’चे मूल्यांकन झाले असून त्यांना विविध श्रेणी प्राप्त आहे. यातही ‘अ प्लस’ श्रेणी प्राप्त महाविद्यालयांची संख्या अवघी २ इतकीच आहे. या आकडेवारीकडे नजर टाकली असता नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांचा दर्जा कसा काय वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालये

‘नॅक’चे मूल्यांकन झालेल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ४७ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर वर्धा जिल्ह्यातील १३ महाविद्यालये आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी चार महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे.

प्रशासनाकडूनदेखील पुढाकार नाही

नागपूर विद्यापीठाने बृहत आराखड्यात २०२४ पर्यंत ४१७ महाविद्यालये ‘नॅक’च्या श्रेणीत आणण्याचे ध्येय मांडले आहे. मात्र यासाठी नेमकी रुपरेषा काय असणार आहे, याबाबत विद्यापीठाने भूमिका उघड केलेली नाही. बहुतांश महाविद्यालयांनी तर ‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी प्रक्रिया सुरूच केलेली नाही. यासाठी महाविद्यालयांना विद्यापीठानेदेखील ठोस निर्देश दिलेले नाहीत.

कसे होणार मूल्यांकन ?

विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांपैकी अनेक ठिकाणी तर सुविधांचा प्रचंड अभाव आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. अनेक महाविद्यालयांत तर पायाभूत सुविधादेखील हव्या तशा नाहीत. त्यातच ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांचे कंबरडे मोडल्या गेले आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अशा स्थितीत महाविद्यालये कुठल्या आधारावर ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशा आहेत ‘नॅक’च्या श्रेणी

जिल्हा - अ प्लस - अ - ब प्लस प्लस - ब प्लस - ब - क

नागपूर - २ - ४ - १० - १० - १४ - ७

वर्धा - ० - १ - ० - ६ - ४ - २

भंडारा - ० - ० - ० - ० - ३ - १

गोंदिया - ० - ० - ० - ० - २ - २

टॅग्स :collegeमहाविद्यालय