शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

पारडसिंग्यातील शेतकऱ्यांकडून हवामानाचा ‘आॅनलाईन’ अंदाज

By admin | Updated: July 17, 2015 03:22 IST

तंत्रज्ञानाच्या युगात मध्य भारतातील शेतकरीदेखील कुठेही मागे नाहीत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुका येथील ...

नागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात मध्य भारतातील शेतकरीदेखील कुठेही मागे नाहीत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर तालुका येथील पारडसिंगा गावातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी ‘आॅनलाईन’ प्रणालीचा वापर सुरू केला आहे. ‘लोकमत’ने पारडसिंगा गावाला बुधवारी भेट देऊन शेतकऱ्यांकडून याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अ‍ॅक्युवेदर.कॉम’चे अधिकारीदेखील होते.मूळची पारडसिंगा येथील असलेली नागपुरातील चित्रकार श्वेता भट्टड हिने याबाबतीत पुढाकार घेतला आहे. आपल्या गावातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज ‘आॅनलाईन’ मिळावा असा विचार तिच्या मनात चार महिन्यांअगोदर आला. ती गावातच ‘ग्राम आर्ट’ नावाचा प्रकल्प चालवते. शेतकऱ्यांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अ‍ॅक्युवेदर.कॉम’ वापरावे यासाठी तेथील प्रगतिशील शेतकरी अमिताभ पावडे यांच्याकडून तिला प्रोत्साहन मिळाले.श्वेताचे भाऊ अ‍ॅड.साकेत भट्टड हे तिच्या मदतीसाठी समोर आले व प्रकल्पाची सुरुवात केली. आम्ही आदर्श ढोरे, वेदनाथ लोही, नवकेश टेकाडे, पार्थ सूर्यवंशी आणि गणेश ढोके या स्थानिक तरुणांना यासाठी प्रशिक्षण दिले व ‘आॅनलाईन’ हवामाचा अंदाज व्यक्त करणारे ‘अ‍ॅप’ तसेच ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अ‍ॅक्युवेदर.कॉम’ या संकेतस्थळाची सखोल माहिती दिली. या तरुणांनी या बाबी फार कमी वेळेत आत्मसात केल्या व दररोज ते गावाच्या मध्यभागी स्थानिक हवामानाचा अंदाज सांगणारा सूचना फलकच लावायला लागले. दररोज अशाप्रकारे हवामानाची माहिती देण्यात येते. यानंतर अ‍ॅड.भट्टड यांना एक आश्चर्याचा धक्काच मिळाला. मी याबाबतीतील सखोल माहिती ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अ‍ॅक्युवेदर.कॉम’ला पाठवली होती. एका गावातील शेतकरी संकेतस्थळाचा उपयोग करत असल्याचे कळताच ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.अ‍ॅक्युवेदर.कॉम’ चे ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक डायरेक्टर’ डॉन हिटॉन यांनी येथे भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. हिटॉन यांच्यासमवेत राष्ट्रीय व्यवस्थापक अभिमन्यू चक्रबर्ती हेदेखील होते. यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले.(प्रतिनिधी)