शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पुुढील वर्षी आॅनलाईन बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:24 IST

विभागात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन दिले जात आहे. जे काम करणार नाहीत त्यांची बदली करायला क्षणाचाही विलंब केला जाणार नाही. माझ्या वहिनीची परळी येथे बदली झाली.

ठळक मुद्देमहादेव जानकर : मी वहिनीचीही बदली थांबविली नाही !

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागात चांगले काम करणाºयांना प्रोत्साहन दिले जात आहे. जे काम करणार नाहीत त्यांची बदली करायला क्षणाचाही विलंब केला जाणार नाही. माझ्या वहिनीची परळी येथे बदली झाली. आईने फोन करून बदली थांबविण्यासाठी मदत करता येईल का, असे विचारले. मी स्पष्ट नकार दिला, असे घरातील उदाहरण सांगत प्रशासकीय बदल्यांमध्ये मी कुणाचीही शिफारस ऐकणार नाही, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी आॅनलाईन बदलीचे धोरण राबविले जाईल व पाच वर्षांपेक्षा जास्त काळ कुणालाही एका ठिकाणी राहता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण तसेच कुलगुरू निवास व मत्स्य महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.ए.के. मिश्रा होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, कुलसचिव डी.बी. राऊत, कार्यकारी परिषदेचे डॉ. सटाले, अभियंता व्ही.सी. वैद्य, खळतकर कंस्ट्रक्शन कंपनीचे खळतकर, कंत्राटदार जितेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.या वेळी जानकर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाला शक्य तेवढी मदत करीत आहेत. त्यामुळे आता या विभागात काम करणारे संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाºयांनी मनापासून काम करून आपल्या ज्ञानाचा फायदा शेतकºयांना करून देण्याची गरज आहे. सर्वच अधिकारी व कर्मचाºयांना नागपूर, पुणे यासारख्या मोठ्या शहरातच नियुक्ती हवी असते. मात्र, तसे होणार नाही. राज्यातील प्रत्येक भागात शेतकºयाला गरज असेल तेथे जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी खा. महात्मे यांनी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात होत असलेला बदल लक्षणीय असल्याचे सांगून मुलीही मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत असल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या राजे यशवंतराव होळकर मेषपालन, कुक्कुट पालन योजनेचा महिलांनी लाभ घेतल्यास निश्चितच आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महापौर नंदा जिचकार यांनी महिलांच्या सर्वच क्षेत्रातील सहभागाबाबत समाधान व्यक्त करून पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने मुलींना अत्याधुनिक वसतिगृह उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.मत्स्यालय उभारणारमत्स्यव्यवसाय मंत्रालयातर्फे केंद्र सरकारच्या सहकार्यातून ससून येथे जगातील पहिल्या क्रमाकांचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर नागपुरातही पशु विद्यापीठाच्या जागेवर मत्स्यालय उभारण्याची आपली तयारी आहे. विद्यापीठाने तसा प्रस्ताव सादर केला तर त्याला त्वरित मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा यावेळी जानकर यांनी केली. सोबतच येथे शेतकºयांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची सूचनाही त्यांनी केली.कुलगुरूंच्या पुनर्नियुक्तीत कायद्याचा अडथळाया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए.के. मिश्रा यांनी अत्यंत चांगले काम करीत विद्यापीठाला नावारूपाला आणले आहे. उद्या, गुरुवारी त्यांचा कार्यकाळा संपत आहे. खरे तर त्यांची पुनर्नियुक्ती करता येईल का, या विषयावर आपण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. पण कायदा आडवा येत असल्याने ते शक्य झाले नाही, असे जानकर यांनी सांगितले. मात्र, भविष्यात मिश्रा यांना योग्य पदावर संधी मिळेल, असे संकेतही त्यांनी दिले.