शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सेवानिवृत्त झालेल्यांना दिला जातोय ऑनलाईन निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:35 IST

लॉकडाऊनच्या काळात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाहीर निरोप समारंभावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या या कर्मचाऱ्यांना महावितरण ऑनलाईन निरोप देत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : महावितरणचा पुढाकार

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनच्या काळात सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जाहीर निरोप समारंभावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे सेवा दिलेल्या या कर्मचाऱ्यांना महावितरण ऑनलाईन निरोप देत आहे.देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. मार्च व एप्रिल महिन्यात महावितरणचे २९६ अभियंता अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यात नागपूर जिल्ह्याच्या १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यल्प ठेवण्यात आली आहे. वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना कार्यालयात न येता, त्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. दरम्यान २९६ कर्मचारी निवृत्त झाले. सध्याच्या वातावरणामुळे त्यांना सन्मानपूर्वक निरोप देता आला नाही. मात्र कंपनीने या कर्मचाऱ्यांची जाणीव ठेवली. मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर व त्यांच्या टीमने व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा उल्लेख करीत सर्वांचे आभार मानले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सर्व संचालकांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. सध्या हा व्हिडिओ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भावूक करीत आहे. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, पूर्वी आम्हाला चार भिंतीआड निरोप दिला जात होता. पण आता संपूर्ण कंपनी या समारंभात सहभागी होत आहे. कंपनीने स्पष्ट केले की, लॉकडाऊन नंतर सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला जाईल.- पाच हजार रुपयांचा निधीकंपनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना निरोप देण्यासाठी पाच हजार रुपयांच्या निधीची तरतूद करून ठेवते. यातून कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाते. कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही सन्मानित करण्यात येते. ग्रॅज्युटी व पीएफची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.- सेनेतून मिळाली प्रेरणामहावितरणचे निदेशक (एचआर) ब्रिगेडीअर पवन गंजू हे सेनेतून निवृत्त झाल्यानंतर महावितरणमध्ये कार्यरत आहे. सेनेमध्ये या प्रकारचे उपक्रम राबविले जातात. महावितरणने सेनेकडूनच प्रेरणा घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस